विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय

भव्य भारत आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सवाबद्दल जनजागृती करण्यासाठी अनेक कार्यक्रमांचे आयोजन

Posted On: 12 DEC 2020 7:42PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 12 डिसेंबर 2020

 

22 ते 25 डिसेंबर, 2020 या कालावधीत होणाऱ्या आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सव (आयआयएसएफ) – 2020 मध्ये सहभागी होण्यासाठी तरुणांना मनापासून संवेदनशील करण्यासाठी कार्यक्रमांची मालिका आयोजित केली जात आहेत.

राष्ट्रीय महासागर तंत्रज्ञान (एनआयओटी), चेन्नईतर्फे आभासी व्यासपीठाच्या माध्यमातून “सामाजिक विकास, राष्ट्र निर्मिती आणि आत्मनिर्भर भारतासाठी जलविज्ञान” या विषयावर एका कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.

गोरखपूर (उत्तरप्रदेश) मध्ये असाच कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. आयसीएमआरने “आनंदी, स्वस्थ आणि स्वावलंबी भारतासाठी आरोग्य संशोधन” या संकल्पनेसह आरोग्य संशोधन परिषद" या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

डीएचआर सचिव आणि आयसीएमआर, महासंचालक, प्रा. (डॉ.) बलराम भार्गव यांनी आयसीएमआर केवळ भारतातच नव्हे तर जगातही एनआयपीएएच, सीसीएचएफ आणि कोविड-19 सारख्या रोगाच्या प्रादुर्भावाचे यशस्वी आणि प्रभावीपणे व्यवस्थापन करत आहेत यावर प्रकाश टाकला.

एम्स गोरखपूरच्या संचालिका प्रा. (डॉ.) सुरेखा किशोर यांनी आपल्या भाषणात “भारत आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सव” च्या संकल्पनेविषयी सविस्तर माहिती दिली यामुळे संपूर्ण जगात विज्ञान क्षेत्रात भारताची शक्ती वाढत जाईल अशी भावना निर्माण होते. विज्ञानाचे वर्णन लोककल्याण असे करताना त्यांनी विज्ञानातील विविध पैलूंनी कोविड-19 साथीच्या आजरा विरुद्ध लढायला कशी मदत केली हे  स्पष्ट केले. आरोग्य सेवांमध्ये विज्ञानाच्या कामगिरीचा उपयोग सांगताना त्यांनी “डिजिटल इंडिया” - ऑनलाईन ओपीडी, रिपोर्टिंग, डिजिटल डायग्नोस्टिक यांच्या भूमिकेचा उल्लेख केला.

आरएमआरसी, गोरखपूरचे संचालक डॉ. रजनी कांत म्हणाले की, जागतिक आव्हाने आणि लोकांच्या हिताचे निराकरण करण्यासाठी जगाने आता भारतीय वैज्ञानिकांच्या भूमिकेची दखल घेण्याची वेळ आता आली आहे. लसी आणि पोषण मिशनमुळे मुलांचे आरोग्य आणि पोषणाची सवोत्तम उंची गाठली आहे.

अंतराळ विज्ञान आणि खगोलशास्त्रशास्त्र आंतर-विद्यापीठ केंद्र (आययूसीएए), पुणे यांनी भारत आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सव 2020 संदर्भात जनजागृती करण्यासाठी वेबिनार आयोजित केले होते.

पुणे नॉलेज क्लस्टर (पीकेसी) चे प्रधान अन्वेषक प्रा. अजित केंभावी यांनी “अल्बर्ट आइनस्टाईन, गुरुत्वाकर्षण लहरी आणि भारत” या विषयावरील व्याख्यान दिले.

वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद (सीएसआयआर) च्या वतीने 10 डिसेंबर रोजी आयआयएसएफ 2020 साठी एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाची संकल्पना होती “व्होकल फॉर लोकल: हींग कथा”.


* * *

S.Thakur/S.Mhatre/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1680269) Visitor Counter : 202