उपराष्ट्रपती कार्यालय
जनतेने लोकप्रतिनिधींना आणि सरकारला त्यांच्या कामगिरीवरून निवडावे-उपराष्ट्रपतींनी लोकांना केले आवाहन
उपराष्ट्रपतींनी वायपीओ- इंडिया ग्रेटर चॅप्टरच्या सदस्यांशी दूरदृश्य प्रणाली द्वारे साधला संवाद
Posted On:
11 DEC 2020 11:00PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 11 डिसेंबर 2020
भारताचे उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांनी जनतेने लोकप्रतिनिधींना आणि सरकारला त्यांच्या कामगिरीवरून निवडावे, असे आवाहन केले आहे.
विशाखापट्टणम येथील वायपीओ -इंडिया ग्रेटर चॅप्टरच्या सदस्यांशी उपराष्ट्रपतींनी दूरदृश्य प्रणाली द्वारे संवाद साधला त्यावेळी त्यांनी जात, गुन्हेगारी, जमातवाद आणि पैसा यांच्या राजकारणात वाढत चाललेल्या प्रभावाबद्दल चिंता व्यक्त केली आणि पात्रता, व्यवहारातील वागणूक, क्षमता आणि चारित्र्य यांना प्रतिनिधींची निवड करताना प्राधान्य द्यावे, असे आवाहन केले.राजकारणाला जनतेची सेवा करण्याची मोहीम, असे संबोधित त्यांनी दीर्घकालीन विधायक धोरणांऐवजी लोकप्रियतेच्या वाढत चाललेल्या प्रवृत्तीची मदत घेण्याच्या प्रथेबाबत त्यांनी चिंता व्यक्त केली.
संसदेत आणि राज्य विधीमंडळांतून घसरत चाललेल्या वादविवादांच्या मापदंडांबाबतही त्यांनी चिंता व्यक्त केली. ही पातळी सर्वत्र घसरत चालली आहे," असे नायडू म्हणाले.
संसदेतील सदस्यांनी केलेल्या विधायक कामांकडेही म्हणावे तसे लक्ष माध्यम देत नाहीत, संसद करत असलेल्या विधायक कार्याला माध्यमांनी अधिक प्रसिद्धी द्यावी, असे आवाहन त्यांनी केले.
शेतकऱ्यांच्या आंदोलनाविषयी बोलताना उपराष्ट्रपती म्हणाले, की सर्व शंकांचे निरसन विधायक चर्चेद्वारे होऊ शकते.
कठोर परिश्रम करावेत,निष्ठा बाळगाव्यात,आणि जीवनात यशस्वी होण्यासाठी इतरांच्या अनुभवांतून शिकवण घ्यावी, असा सल्ला उपराष्ट्रपतींनी तरुण उद्योग धुरीणांनी दिला. भारताच्या वाटून घेणे आणि काळजी घेणे' (शेअर आणि केअर) आहे यासारख्या प्राचीन वारशांची आठवण करून देत नायडू यांनी तरुण कार्यकारी अधिकाऱ्यांसाठी समाजाची परतफेड करण्याचे महत्त्व अधोरेखीत केले.
तरुण उद्योजक देशाचे भवितव्य आहेत असे सांगत नायडू म्हणाले की भारतात बुध्दिमत्तेचा अभाव नाही, परंतु त्यांच्यातील प्रतिभा ओळखायला हवी आणि त्यांच्या कौशल्यांत सुधारणा घडवायला हवी. आर्यभट्ट, चरक, सुश्रुत या महान भारतीयांचा उल्लेख करत ते म्हणाले की या भूमीत काही तरी विशेष आहे.
उद्योजक देशाच्या संपतीचे निर्माते आहेत, असे म्हणत उपराष्ट्रपतींनी भारतीय उद्योगांनी कारभारात नैतिक तत्वे स्विकारावीत असेही त्यांनी सांगितले.
एखाद्याच्या जीवनातील मातृभाषेचे महत्त्व विशद करत नायडू म्हणाले की इंग्लिश गरजेची आहे पण एखाद्याने जेवढ्या भाषा शिकता येतील तितक्या भाषा शिकाव्यात, परंतु कधीच मातृभाषेचे विसर पडू देऊ नये.
या ऑनलाईन समारंभाला वायपीओ इंडिया ग्रेटर चॅप्टरचे सदस्य उपस्थित होते. त्यात भारतीय उद्योग जगतातील अनेक मान्यवरही होते.
* * *
G.Chippalkatti/S.Patgaonkar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1680232)
Visitor Counter : 160