केंद्रीय लोकसेवा आयोग
अभियांत्रिकी सेवा (मुख्य) परीक्षा 2020 चा निकाल जाहीर
Posted On:
11 DEC 2020 6:39PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 11 डिसेंबर 2020
केंद्रीय लोकसेवा आयोगाने अभियांत्रिकी सेवा (मुख्य) लेखी परीक्षेचा निकाल जाहीर केला आहे. मुलाखत/व्यक्तिमत्व चाचणीसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी अनुक्रमांकासह केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या संकतेस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आली आहे.
अभियांत्रिकी सेवा परीक्षा 2020 नियमांनुसार उमेदवारांना आयोगाच्या https://upsconline.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध असलेला सविस्तर अर्ज (DAF) भरणे अनिवार्य आहे. 24.12.2020 ते 05.01.2021 पर्यंत सदर अर्ज आयोगाच्या संकेतस्थळावर उपलब्ध असणार आहे.
मुलाखतीचे वेळापत्रक उमेदवारांना कळवण्यात येईल. मुलाखतीचा निश्चित दिनांक उमेदवारांना ई-पत्राद्वारे कळवण्यात येईल. तसेच अनुक्रमांकानुसार मुलाखतीचे वेळापत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात येईल. उमेदवारांना विनंती आहे की यासंदर्भातील अद्ययावत माहितीसाठी आयोगाच्या ( https://upsc.gov.in) या संकेतस्थळाला भेट द्यावी.
निकाल केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या https://upsc.gov.inसंकेतस्थळावर उपलब्ध आहे.
उमेदवार लोकसेवा आयोगाच्या 23388088, (011)-23385271/23381125/23098543 या दूरध्वनी क्रमांकांवर सकाळी 10.00 ते संध्याकाळी 5.00 या वेळेत परीक्षा/निकालाच्या माहितीसंबंधी संपर्क साधू शकतात.
तसेच ऑनलाईन सविस्तर अर्जासंबंधी उमेदवारांना काही अडचणी असल्यास उमेदवारांनी कार्यालयीन कामकाजाच्या वेळेत 23388088/23381125 Ext.4331/4340 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा.
S.Thakur/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1680054)
Visitor Counter : 277