विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय
डॉ. हर्ष वर्धन यांनी लडाख येथील डीआरडीओच्या अति उंच प्रदेश संशोधन संरक्षण संस्थेद्वारा आयोजित आयआयएसएफ 2020 च्या कर्टन रेजर कार्यक्रमाला व्हर्च्युअली संबोधित केले
Posted On:
08 DEC 2020 8:39PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 8 डिसेंबर 2020
केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान, भू विज्ञान आणि आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री डॉ. हर्ष वर्धन म्हणाले की, कोविड -19 मुळे यावर्षी भारतीय आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सव -2020 च्या आभासी मंचावर आयोजनातून विज्ञान, तंत्रज्ञान आणि नाविन्यपूर्ण संशोधनाच्या सर्व हितधारकांमध्ये वैज्ञानिक आवड जोपासण्याची अदम्य भावना दिसून येते. संरक्षण संशोधन व विकास संघटनेच्या (डीआरडीओ), लडाख येथील डिफेन्स इन्स्टिट्यूट ऑफ हाय अल्टिट्यूड रिसर्च (डीआयएचआर) द्वारा आयोजित आयआयएसएफ -2020 च्या पूर्वतयारी कार्यक्रमात मुख्य पाहुणे म्हणून ते व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संबोधित करत होते.
या आभासी कार्यक्रमात सहभागी झालेल्यांमध्ये लडाख केंद्रशासित प्रदेशाचे नायब राज्यपाल आर के माथुर,, लडाखमधील खासदार जामयांग सेसरिंग नामग्याल , एलएचडीसी, लेह, लडाखचे मुख्य कार्यकारी नगरसेवक ताशीगिलसन, डीडी आर अँड डी सचिव आणि डीआरडीओचे अध्यक्ष डॉ जी जी सतीश रेड्डी, आणि डॉ ओ.पी. चौरसिया, संचालक डीआयएचएआर, लेह; उपस्थित होते.
“डिजिटल मंचाच्या उपयोगाने आयआयएसएफ देशाच्या दुर्गम भागातील लोकांना एकाच क्लिकने एकत्र आणू शकेल आणि त्यातून आयआयएसएफच्या आयोजनाचे उद्दिष्ट पूर्ण करण्यात मदत होईल.” अशी डॉ. हर्ष वर्धन यांनी आशा व्यक्त केली . विज्ञान आणि तंत्रज्ञानातील सर्व हितधारक आणि या महोत्सवातील भाग असलेल्या संबंधित संस्थांना त्यांनी यशस्वी होण्यासाठी शुभेच्छा दिल्या . ते म्हणाले, “आयआयएसएफ - 2020 मध्ये 10 हजार हून अधिक संशोधक, शास्त्रज्ञ आणि विविध विषयांतील तज्ज्ञांना त्यांच्या संशोधनाच्या निष्कर्षांवर चर्चा करण्यासाठी आणि संशोधन विषयांवर नवीन कल्पनांची देवाणघेवाण करण्यासाठी एकत्र आणण्याचा प्रस्ताव आहे. ”
“आयआयएसएफ -2020 ची संकल्पना : ‘आत्मनिर्भर भारत आणि जागतिक कल्याणासाठी विज्ञान’ अशी असून सध्याच्या संदर्भात अतिशय प्रासंगिक आहे , जेव्हा देश विकासाला गती देण्यासाठी आणि आत्मनिर्भर भारताचे स्वप्न साकारण्यासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञानाकडे पाहत आहे असे डॉ. हर्ष वर्धन यांनी स्पष्ट केले . ते म्हणाले, “भारतीय आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सव हा सर्व क्षेत्रातील विद्यार्थी आणि विज्ञानप्रेमी नागरिकांसाठी बहुप्रतीक्षित वार्षिक कार्यक्रम आहे”.
लडाखमध्ये वैज्ञानिक विकासाच्या माध्यमातून स्थानिक लोकसंख्या व सैनिक यांच्या राहणीमानात सुधारणा करण्यात दिलेल्या विशिष्ट योगदानामुळे 11हजार 500 फूट उंचीवरील डीआरडीओ च्या ‘डिफेन्स इन्स्टिट्यूट ऑफ हाय अल्टिट्यूड रिसर्च’ संस्थेची या कार्यक्रमासाठी निवड करण्यात आली आहे. “आज लडाखमधील शेतकरी शेतीसाठी अनुकूल नसलेल्या प्रदेशात फळे आणि भाजीपाला पिकवत आहेत, जे काही दशकांपूर्वी शक्य नव्हते”. “तळागाळापर्यंत बदल घडवून आणण्यासाठी या संस्थेचे योगदान विज्ञान व तंत्रज्ञानाच्या सामर्थ्याचे खरे प्रतिबिंब आहे. माझ्या मते, भारतीय आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सव -2020 च्या संयोजकांनी या आगामी महोत्सवाच्या कर्टन रेजर कार्यक्रमासाठी योग्य ठिकाणाची निवड केली आहे. संस्थेमार्फत केले जात असलेले कार्य या कार्यक्रमाच्या लक्ष्याशी सुसंगत आहे,असे त्यांनी समाधानाने नमूद केले. ते म्हणाले, “या महोत्सवाचा एक कार्यक्रम नव्याने स्थापित केंद्रशासित प्रदेश लडाख येथे आयोजित करण्यात आल्याबद्दल मी समाधानी आहे.”
लडाख केंद्र शासित प्रदेशाचे नायब राज्यपाल आर के. माथूर यांनी आपल्या भाषणात विज्ञान आणि तंत्रज्ञानाची लोकांचा सामाजिक-आर्थिक स्तर सुधारण्यातील भूमिका विशद केली तसेच आपल्या देशाच्या कानाकोपऱ्यात विज्ञान आणि तंत्रज्ञान पोहोचवण्याच्या क्षमतेबद्दल माहिती दिली. “लडाखमधील सध्याचे प्रतिकूल वातावरण मानव व प्राणी यांच्या अस्तित्वासाठी मोठे आव्हान आहे त्यामुळे या प्रदेशात होणारा हा कार्यक्रम अधिक योग्य ठरला आहे, . विज्ञान आणि तंत्रज्ञानाने सामान्य लोकांसाठी लडाखमध्ये उपजीविका अधिक आरामदायी करण्यात आणि स्थानिक शेतकऱ्यांना मोबदला देण्यात खूप मदत केली असून यात डीआयएचएआरचे योगदान कौतुकास्पद आहे. ” शून्य कार्बन उत्सर्जनासह हा प्रदेश स्वावलंबी बनवण्यासाठी लडाखच्या अक्षय ऊर्जेच्या स्त्रोतांचा वापर करण्याच्या प्रचंड क्षमतेबद्दलही त्यांनी माहिती दिली.
या कार्यक्रमामध्ये प्रशासन, धोरण, शिक्षण, कृषी, उद्योजकता आणि विद्यार्थी यासारख्या विविध क्षेत्रातून अनेकांनी ऑनलाइन माध्यमांद्वारे सहभाग नोंदवला .
आभासी माध्यमातून 22 ते 25 डिसेंबर 2020 या कालावधीत 6 वा भारतीय आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सव (आयआयएसएफ) -2020 आयोजित केला जात आहे. या संदर्भात देशाच्या वेगवेगळ्या भागात या महोत्सवाची ओळख करून देणारी मालिका आयोजित केली जात आहे जेणेकरून जास्तीत जास्त लोकांना त्याचा फायदा होईल.
आभासी व्यासपीठावरील हा सर्वात मोठा विज्ञान महोत्सव आहे. यावर्षी, 9 श्रेणीअंतर्गत 41 कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार आहे. यावर्षी आयआयएसएफ 2020 गिनीज वर्ल्ड रेकॉर्डच्या पाच वेगवेगळ्या प्रकारात प्रवेशासाठी प्रयत्न करत आहे. 41 कार्यक्रमांपैकी 33 कार्यक्रमांसाठी नोंदणी सुरु आहे. अनिवासी मंत्री आणि राजनैतिक अधिकाऱयांच्यी परिषद, स्टेट एस अँड टी कॉन्क्लेव्ह, भारतातील विज्ञान शिक्षण आणि गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड यामधील सहभाग नामनिर्देशन व थेट आमंत्रणाद्वारे असेल. . इतर कार्यक्रमांमध्ये खुली नोंदणी असेल. आयआयएसएफ 2020 च्या https://www.scienceindiafest.org/#/homeवर नोंदणी करता येईल.
Jaydevi P.S/S.Kane/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1679197)
Visitor Counter : 274