संरक्षण मंत्रालय

भारतीय सैन्याने आपला 260 वा सैन्य सेवा कोअर वर्धापन दिन केला साजरा

प्रविष्टि तिथि: 08 DEC 2020 7:04PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 8 डिसेंबर 2020

 

भारतीय सैन्याने, आज  मंगळवार दिनांक 08 डिसेंबर 2020 रोजी 260 वा सैन्य सेवा वाहिनी वर्धापन दिन साजरा केला. या दिवसाचा प्रारंभ, सर्व साधारण पुरवठा आणि परीवहन डायरेक्टर जनरल आणि वरीष्ठ कर्नल कमांडंट लेफ्टनंट एमकेएस यादव यांनी राष्ट्रीय युध्दस्मारकाला पुष्पचक्र वाहून,त्याचबरोबर देशभरातील विविध सैन्य सेवा वाहिनी आस्थापनांच्या स्थानावर अशाच प्रकारचे समारंभ आयोजित करून झाला.

या समारंभाच्या  निमित्ताने दिनांक 04 पासून ते 08 डिसेंबर 2020 पर्यंत 260 किलोमीटर लांब पल्ल्याची युध्दस्मारक चंडीमंदीर ते राष्ट्रीय युद्ध स्मारक दिल्ली,रन फॉर मार्टियर’ या संकल्पनेवर आधारीत दौड आयोजित करण्यात आली. लेफ्टनंट कर्नल इंद्रजीत सिंग आणि त्यांच्या तेरा सदस्यांच्या चमूने फिट इंडिया मोहिमेच्या भावनेला प्रोत्साहन देण्यासाठी हे अंतर चार दिवसांत पार केले. ही दौड सैन्यदलाच्या पश्चिम विभागाचे कमांडर लेफ्टनंट जनरल आर.पी सिंग यांनी अंबाला,कुंजपूरा,आणि  मोतीलाल नेहरू स्पोर्ट्स स्कूल,राय अशा विविध ठिकाणच्या विविध युध्दस्मारकांवर हुतात्मा झालेल्यांसाठी झेंडा फडकावत सुरुवात केली, त्यानंतर  सर्व साधारण पुरवठा आणि परीवहन डायरेक्टर जनरल  आणि वरीष्ठ कर्नल कमांडंट लेफ्टनंट जनरल एमकेएस यादव यांनी या चमूचे दिनांक 08 डिसेंबर 2020 रोजी झेंडा फडकावत स्वागत केले.

M.Chopade/S.Patgaonkar/P.Malandkar

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(रिलीज़ आईडी: 1679158) आगंतुक पटल : 240
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Punjabi , Tamil , Malayalam