भूविज्ञान मंत्रालय
बुरेवी चक्रीवादळ मन्नारच्या आखातावर (दक्षिण तामिळनाडू व दक्षिण केरळ किनाऱ्यांवर वादळाचा इशारा : लाल संदेश)
वादळाचे केंद्र मन्नारच्या आखातावर , मन्नारच्या पश्चिम-वायव्येकडे 40 कि.मी., पम्बनच्या (भारत)पूर्व- आग्नेय भागात 40 कि.मी. व कन्याकुमारीच्या पूर्व- ईशान्येस 260 कि.मी. वर
पम्बन आणि कन्याकुमारी दरम्यान 3 डिसेंबर आणि 4 डिसेंबर च्या दरम्यान वादळ दक्षिण तामिळनाडू किनारा ओलांडणार
तामिळनाडूचे रामनाथपुरम, थुथ्थुकुडी, तिरुनवेली आणि कन्याकुमारी हे जिल्हे आणि आसपासचे दक्षिण केरळमधील जिल्हे इथे 4 डिसेंबरच्या सकाळपर्यंत वादळाची तीव्रता जाणवत राहील.
दक्षिण तामिळनाडूत काही ठिकाणी 3 डिसेंबरला जोरदार पर्जन्यवृष्टी तर दक्षिण तामिळनाडू आणि दक्षिण केरळमध्ये 4 डिसेंबरला जोरदार ते अति मुसळधार पावसाची शक्यता
वादळामुळे 1 मीटर उंचीच्या लाटांची शक्यता
दक्षिण तामिळनाडू आणि दक्षिण केरळमध्ये नुकसानीची शक्यता- झोपड्या, वीज व दळणवळण, तांदूळ शेती, केळी, पपई आणि बागायतींच्या पडझडीची शक्यता
Posted On:
03 DEC 2020 6:03PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 3 डिसेंबर 2020
भारतीय हवामान विभागाच्या (IMD) वादळ पुर्वानुमान विभागाने दिलेल्या इशाऱ्यानुसार:
‘बुरेवी’ चक्रीवादळ श्रीलंकेच्या उत्तरेकडून गेल्या 6 तासात पश्चिम-वायव्येकडे 13 ताशी किमी वेगाने सरकले आहे आणि भारतीय प्रमाणवेळेनुसार 3 डिसेंबर रोजी 11.30 वाजता ते मन्नारच्या आखातावर, मन्नारपासून 40 कि.मी वर, पम्बनच्या (भारत)पूर्व- आग्नेय भागात 40 कि.मी., कन्याकुमारीच्या पूर्व-ईशान्येस 260 कि.मी. वर सक्रीय असेल. यामुळे वाहणाऱ्या वाऱ्यांचा वेग ताशी 70 ते 80 किमी राहील व तो ताशी 90 कि.मी. पर्यंतही वाढू शकेल,
दुपारपर्यंत बुरेवी चक्रीवादळ पम्बन भागाच्या पश्चिमेच्या दिशेने सरकेल. नंतर ते पश्चिम-नैऋत्य दिशेने जात 3 डिसेंबरच्या रात्री पंम्बन आणि कन्याकुमारी दरम्यान तामिळनाडू किनारपट्टी ओलांडेल व 4 डिसेंबरला सकाळी वादळी वाऱ्यांचा वेग ताशी 70-80 कि मी ते 90 कि मी पर्यंत पोचेल. तामिळनाडूचे रामनाथपुरम, थुथ्थुकुडी, तिरुनवेली आणि कन्याकुमारी हे जिल्हे आणि आसपासचे दक्षिण केरळमधील जिल्हे इथे याचा प्रभाव 4 डिसेंबर पर्यंत जाणवेल.
वादळाची वाटचास आणि तीव्रता यांचे अनुमान पुढीलप्रमाणे:
Date/Time(IST) |
Position (Lat. 0N/ long. 0E) |
Maximum sustained surface wind speed (Kmph) |
Category of cyclonic disturbance |
03.12.20/1130 |
9.2/79.6
|
70-80 gusting to 90 |
Cyclonic Storm
|
03.12.20/1730 |
9.2/79.1 |
70-80 gusting to 90 |
Cyclonic Storm
|
03.12.20/2330 |
9.0/78.5 |
70-80 gusting to 90 |
Cyclonic Storm
|
04.12.20/0530 |
8.9/78.0 |
60-70 gusting to 80 |
Cyclonic Storm
|
04.12.20/1130 |
8.8/77.4 |
50-60 gusting to 70 |
Deep Depression
|
04.12.20/2330 |
8.7/76.3 |
40-50 gusting to 60 |
Depression
|
इशारा
(i) पाऊस
- 3 डिसेंबरला दक्षिण तामिळनाडूत काही ठिकाणी म्हणजे रामनाथपुरम,थुथ्थुकुडी,तिरुनवेली,कन्याकुमारी, तेंकासी, विरुधुनगर, थेनी, मदुराई व सिवगंगाई जिल्ह्यांमध्ये व दक्षिण केरळात थिरूवनंतपुरम, कोलम, पथ्थनमथ्थिट, इडुकी आणि अलापुझा या जिल्हयांत मुसळधार पर्जन्यवृष्टीची शक्यता, तर 4 डिसेंबरला दक्षिण तामिळनाडू व दक्षिण केरळात तुरळक ठिकाणी अति मुसळधार पर्जन्यवृष्टीची शक्यता.
- दक्षिण तामिळनाडू, पुद्दुचेरी, माहे, करईक्कल आणि उत्तर केरळात 4 डिसेंबरला तुरळक ठिकाणी मुसळधार पर्जन्यवृष्टीची शक्यता.
- 3 व 4 डिसेंबरला आंध्रप्रदेशची दक्षिण किनारपट्टी आणि लक्षद्वीपला मुसळधार पर्जन्यवृष्टीची शक्यता.
Sub-Divisions
|
03 Dec 2020*
|
04 Dec 2020*
|
South Tamilnadu
|
Rainfall at most places with heavy to very heavy rainfall at few places and extremely heavy fall at isolated places
|
Rainfall at many places with heavy to very heavy rainfall at isolated places
|
North Tamilnadu, Puducherry & Karaikal
|
Rainfall at many places with heavy to very heavy rainfall at isolated places
|
Rainfall at many places with heavy fall at isolated places
|
South Kerala
|
Rainfall at most places with heavy to very heavy rainfall at few places and extremely heavy fall at isolated places
|
Rainfall at many places with heavy to very heavy rainfall at isolated places
|
North Kerala & Mahe
|
Rainfall at most places with heavy to very heavy rainfall at isolated places
|
Rainfall at a few places with heavy fall at isolated places
|
South Coastal Andhra Pradesh
|
Rainfall at a few places with heavy rainfall at isolated places
|
Rainfall at a few places with heavy rainfall at isolated places
|
Lakshadweep
|
Rainfall at many places
|
Rainfall at most places with heavy to very falls at isolated places
|
(ii) जोरदार वाऱ्यांचा इशारा
- पुढील 24 तासांमध्ये दक्षिण तामिळनाडूत किनारपट्टी भागात (रामनाथपुरम,थुथ्थुकुडी,तिरुनवेली व कन्याकुमारी जिल्ह्यांमध्ये) व आसपास जोरदार वाऱ्यांचा वेग ताशी 70-80 किमी ते ताशी 90 पर्यंत तर दक्षिण केरळ ( थिरूवनंतपुरम, कोलम, पथ्थनमथ्थिट, आणि अलापुझा जिल्ह्यात) व आसपास ताशी 75 कि.मी वेगाने वारे वाहतील. त्यांनंतर वाऱ्यांचा वेग मंदावेल.
- 3 व 4 डिसेंबरला लक्ष्द्विप मालदीव तसेच अरबी समुद्राचा त्या जवळपासच्या पट्टयात ताशी 45-55 किमी वेगाने घोंघावत वाहणाऱ्या वाऱ्यांचा वेग 65 किमी पर्यत जाईल.
(iii) वादळी लाटा
- पुढील 6 तासांमध्ये 1 मीटरपर्यंतच्या उंच लाटांमुळे दक्षिण तामिळनाडूच्या दक्षिण किनारपट्टीवरील सखल भूभाग (रामनाथपुरम,थुथ्थुकुडी,तिरुनवेली व कन्याकुमारी जिल्हे) व श्रीलंकेची वायव्य किनारपट्टीकडील भाग जलमय होण्याची शक्यता.
(iii) समुद्राची स्थिती
- 3 व 4 डिसेंबरला मन्नारचे आखात, दक्षिण तामिळनाडू आणि जवळपासचे भाग, श्रीलंकेचा पश्चिम किनारपट्टी व (केप)कोमोरिन, अरबी समुद्राचा जवळपासचा भाग व केरळ किनारपट्टी या भागात समुद्र खवळलेला ते अति खवळलेला असेल.
- बंगालची खाडी, श्रीलंकेचा ईशान्य किनारपट्टी येथेही समुद्र खवळलेला ते अति खवळलेला असेल, ही परिस्थिती 3 डिसेंबरच्या मध्यरात्रीपर्यंत राहील व हळूहळू निवळेल.
- लक्षद्विप मालदीव व अरबी समुद्राचा त्या जवळपासचा भाग येथे 3 ते 5 डिसेंबरपर्यंत समुद्र खवळलेला ते अति खवळलेला असेल.
(iv) दक्षिण तामिळनाडूत कन्याकुमारी, तिरुनवेली, थुथ्थुकुडी व रामनाथपुरम जिल्ह्यांत तर दक्षिण केरळात थिरूवनंतपुरम, कोलम, पथ्थनमथ्थिट, आणि अलापुझा या जिल्हयांत नुकसान होण्याची शक्यता.
- शाकारलेल्या झोपड्यांचे नुकसान
- झाडांच्या फांद्या पडून वीज व दळणवळणाच्या तारांचे नुकसान
- कच्च्या रस्त्यांना भरपूर तर पक्क्या रस्त्यांना काही प्रमाणात नुकसान पोचेल
- शेते तसेच केळी, पपई व बागायतींचे नुकसान
- कच्चे बांधारे उखडले जाऊन सखल भागात समुद्राचे पाणी शिरण्याची शक्यता
(v) मच्छीमारांना सूचना
- खालील भागांमध्ये 3 ते 5 डिसेबर या कालावधील मासेमारी पूर्णतः बंद राहील
- बंगालच्या उपसागरात नैऋत्येला व श्रीलंकेची पूर्व किनारपट्टीजवळ 3 डिसेबर तर कोमोरिन भाग , मन्नार आखात, दक्षिण तामिळनाडू- केरळ , श्रीलंकेचा पश्चिम किनार येथे 3 व 4 डिसेंबर आणि लक्षद्विप, मालदीव, त्या आसपासचा अरबी समुद्राचा भाग येथे 3 ते 5 डिसेंबर दरम्यान समुद्रात न जाण्याचा इशारा मच्छीमारांना देण्यात आला आहे.
Cyclonic Storm ‘BUREVI’ at 9.2N/79.6E
|



3 डिसेंबरच्या वादळाच्या तीव्रतेचा 0000 UTC वरील INCOIS मॉडेलवर आधारित अंदाज


वादळाच्या अनुमानाची व्यवस्था सतत देखरेखीखाली असून संबधित राज्य सरकारांना वेळोवेळी सूचना दिल्या जातील.
अद्ययावत माहितीसाठी www.rsmcnewdelhi.imd.gov.in व www.mausam.imd.gov.in संकेतस्थळांना भेट द्या.
कृपया, विशिष्ठ भागातील हवामानाचा अंदाज जाणून घेण्यासाठी MAUSAM APP डाऊनलोड करा. शेतीविषयक हवामान अंदाजासाठी MEGHDOOT APP तर वीजांच्या इशाऱ्यांबद्दल माहिती करुन घेण्यासाठी DAMINI APP डाऊनलोड करा.
* * *
Jaydevi PS/V.Sahajrao/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1678067)
Visitor Counter : 252