अर्थ मंत्रालय

आयएफएससीएने इंटरनॅशनल आंतरराष्ट्रीय विमा पर्यवेक्षक संघाचे (आयएआयएस) सदस्यत्व मिळवले

Posted On: 02 DEC 2020 7:08PM by PIB Mumbai

नवी दिल्ली ,  2 डिसेंबर 2020

 

आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र प्राधिकरणाने (आयएफएससीए) आंतरराष्ट्रीय विमा पर्यवेक्षक संघाचे  (आयएआयएस) सदस्यत्व मिळवले आहे.

1994 मध्ये स्थापन  आयएआयएसचे मुख्यालय स्वित्झर्लंडमध्ये आहे. ती 200 हून अधिक कार्यक्षेत्रातील विमा पर्यवेक्षक आणि नियामकांची स्वयंसेवी सदस्यत्व असलेली संस्था आहे.  जगातील विमा प्रीमियममध्ये तिचा 97 टक्के हिस्सा आहे. विमा क्षेत्राच्या देखरेखीसाठी तत्त्वे, मानके व इतर सहाय्यक साहित्य विकसित करण्यास व त्यात मदत करण्यासाठी जबाबदार अशी आंतरराष्ट्रीय स्तरावरील ही संस्था आहे. आयएआयएस सदस्यांना त्यांचे अनुभव आणि विमा पर्यवेक्षण आणि विमा बाजारपेठेबद्दलचे ज्ञान सामायिक करण्यासाठी एक मंच देखील ती प्रदान करते.

आयएआयएसला सामूहिक कौशल्याची मान्यता स्वीकारून  जी -20 देश आणि इतर आंतरराष्ट्रीय मानक संस्थांद्वारे नियमितपणे निमंत्रित केले जाते.

या सदस्यत्वासह  आयएफएससीएला  आयएआयएसच्या जागतिक नेटवर्कमध्ये प्रवेश असेल आणि इतर जागतिक नियामकांबरोबर कल्पना आणि माहितीची देवाणघेवाण करता येईल.  यामुळे जीआयएफटी सिटी येथे आयएफएससीमध्ये जागतिक विमा केंद्र  विकसित करण्यास मदत होईल. सध्या जीआयएफटी आयएफएससीकडून ऑफशोअर विमा आणि पुनर्विमा व्यवसाय सुरू करणाऱ्या 17 अग्रगण्य विमा संस्था कार्यरत आहेत. आयएफएससीला जागतिक विमा संस्थांशी जोडण्यासाठी हे सदस्यत्व मदत करेल  आणि इतर जागतिक केंद्रांबरोबर जागतिक विमा व्यवसायाच्या  संयुक्त विकासात आयएफएससीएला मदत करेल.

ब्रिटन - फिनान्शिअल कन्डक्ट ऑथॉरिटी  (एफसीए), अमेरिका - नॅशनल असोसिएशन ऑफ इन्शुरन्स कमिशनर  (एनआयएसी), अमेरिका - युनायटेड स्टेट्स ऑफ ट्रेझरी विभागाचे विमा फेडरल इन्शुरन्स ऑफिस (एफआयओ), सिंगापूर- सिंगापूर  मॉनेटरी अथॉरिटी (एमएएस), भारत- भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरण (आयआरडीएआय) हे आयएआयएसचे काही आघाडीचे सदस्य आहेत.

 

G.Chippalkatti/S.Kane/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1677782) Visitor Counter : 136