भूविज्ञान मंत्रालय

देशाच्या नैऋत्येला आणि लगतच्या बंगालच्या उपसागराच्या आग्नेय भागात खोलवर कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे (तामिळनाडू आणि केरळच्या दक्षिण किनाऱ्यांच्या भागात चक्रीवादळाचा इशारा – पिवळा बावटा)


येत्या चोवीस तासांत चक्रीवादळ अधिक तीव्र होईल अशी दाट शक्यता

या भागातील मासेमारीचे सर्व व्यवहार 1 डिसेंबर ते 4 डिसेंबर या कालावधीत पूर्णपणे बंद ठेवण्याचा हवामान विभागाचा सल्ला

Posted On: 01 DEC 2020 6:52PM by PIB Mumbai


 

चक्रीवादळाचा इशारा देणाऱ्या भारतीय हवामान खात्याच्या विभागाच्या म्हणण्यानुसार, बंगालच्या उपसागराच्या आग्नेय दिशेला असलेला कमी दाबाचा पट्टा आता तीव्र स्वरूपाचा झाला असून तो 1डिसेंबरला पहाटेसाडेपाचच्या सुमारास नैऋत्य दिशेकडील भागात सरकला आहे. सकाळी साडेआठच्या सुमाराला तो श्रीलंकेतील  त्रिंकोमालीच्या पूर्व-आग्नेय दिशेला 500 किमीवर आणि कन्याकुमारीपासून पूर्व-आग्नेय दिशेला 900 किमीवर स्थिरावला होता.

येत्या चोवीस तासांत हे चक्रीवादळ तीव्र होण्याची दाट शक्यता आहे. ते पश्चिम-वायव्येकडे सरकण्याची शक्यता आहे, 2 तारखेच्या संध्याकाळपर्यंत ते त्रिंकोमालीजवळून पुढे जाईल. त्यानंतर 3 डिसेंबरच्या सकाळी ते आणखी पश्चिमेकडे प्रवास करून, मन्नारच्या आखातात आणि लगतच्या कोमोरीन भागात पोहोचेल आणि तामिळनाडूच्या किनारी भागाकडे सरकत जाईल.

 

हवामानाचा अंदाज आणि तीव्रता यांचा तपशील खाली दिला आहे. ( chart )

Date/Time(IST)

Position

(Lat. 0N/ long. 0E)

Maximum sustained surface

wind speed (Kmph)

Category of cyclonic disturbance

01.12.20/0830

7.8/85.7

50-60 gusting to 70

Deep Depression

01.12.20/1130

7.9/85.3

55-65 gusting to 75

Deep Depression

01.12.20/1730

8.1/84.6

60-70 gusting to 75

Cyclonic Storm

01.12.20/2330

8.3/83.9

65-75 gusting to 85

Cyclonic Storm

02.12.20/0530

8.4/83.2

75-85 gusting to 95

Cyclonic Storm

02.12.20/1730

8.6/81.7

75-85 gusting to 95

Cyclonic Storm

03.12.20/0530

8.7/80.3

65-75 gusting to 85

Cyclonic Storm

03.12.20/1730

8.7/79.3

70-80 gusting to 90

Cyclonic Storm

04.12.20/0530

8.5/78.5

70-80 gusting to 90

Cyclonic Storm

 

इशारा:

i.     पाऊस

•     तामिळनाडूच्या दक्षिण भागात 2आणि 3 डिसेंबरला, केरळच्या दक्षिण भागात 2,3 आणि 4 डिसेंबरला काही ठिकाणी तीव्र ते अतितीव्र स्वरूपाचा पाऊस पडेल, तर या काळात तुरळक ठिकाणी अत्यंत जोरदार  पडेल अशी दाट शक्यता आहे.

•     1 डिसेंबरला तामिळनाडूच्या समुद्र किनाऱ्याच्या भागात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडेल. 2 आणि 3 डिसेंबरला उत्तर तामिळनाडू, पुदुचेरी, माहे आणि करियाकल भागात तसेच केरळच्या उत्तर भागात जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता आहे, या भागात 4 तारखेला तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल.

•     आंध्रप्रदेशाच्या दक्षिण किनारपट्टीच्या भागात तुरळक ठिकाणी येत्या 2 आणि 3 तारखेला तर लक्षद्वीप परिसरात 3 आणि 4 तारखेला मुसळधार पाऊस पडेल.

ii.    वादळी वाऱ्यांचा इशारा

•     येत्या 12 तासांत बंगालच्या उपसागरात दक्षिणेला मध्यवर्ती भागात ताशी 50 ते 60 किमी वेगाने वादळी वारे वाहतील आणि त्यांचा वेग ताशी 70 किमीपर्यंत वाढू शकेल.

•     बंगालच्या उपसागरात नैऋत्येला आणि लगतच्या आग्नेय भागात 1 तारखेच्या संध्याकाळपासून या वादळी वाऱ्यांचा वेग हळूहळू वाढत जाऊन ताशी 60 ते 70 किमी तर कधीकधी ताशी 80 किमीपर्यंत वाढेल. बंगालच्या उपसागराच्या आग्नेय दिशेकडील भाग, श्रीलंकेचा किनारपट्टीचा भाग या परिसरात 2 तारखेच्या सकाळपासून पुढचे 24 तास ताशी 70 ते 80 किमी वेगाने वादळी वारे वाहतील तसेच अधूनमधून ताशी 90 किमी वेगाने सोसाट्याचे वारे वाहतील.

iii.    समुद्राची परिस्थिती

•     सध्या खवळलेला समुद्र १ तारखेनंतरही बंगालच्या उपसागराच्या आग्नेय दिशेकडील भागात आणि श्रीलंकेच्या किनारपट्टीवर आणि लगतच्या भागात भाग तीव्र ते अतितीव्र स्वरुपात खवळलेला राहील.2 आणि 4 डिसेंबरला कोमोरीन परिसर, मन्नारचे आखात, तामिळनाडू आणि केरळच्या दक्षिण किनारपट्ट्या आणि लगतच्या भागात समुद्र तीव्र ते अतितीव्र स्वरुपात खवळलेला राहील.

iv.    मच्छिमारांसाठी इशारा

•     1 ते 4 डिसेंबर या काळात मासेमारीचे सर्व व्यवहार बंद ठेवण्यात येणार आहेत.

•     मासेमारीसाठी समुद्रात गेलेल्या सर्व मच्छिमारांना आजच्या आज किनाऱ्यावर परत येण्यास सांगण्यात आले आहे.

हवामानसंदर्भातील सर्व घडामोडींवर  सतत लक्ष ठेवण्यात येत असून वादळाचा धोका असणाऱ्या राज्यांशी नियमितपणे संपर्क साधून माहिती देण्यात येत आहे.

सविस्तर माहितीसाठी कृपया पुढील संकेतस्थळाला भेट दया:

www.rsmcnewdelhi.imd.gov.in , www.mausam.imd.gov.in

हवामानाचा स्थळविशिष्ट अंदाज आणि धोक्याचे इशारे यांसाठी मौसम अॅप, शेतीविषयक सल्ल्यासाठी मेघदूत अॅप आणि वीज पडण्याबद्दलचे धोक्याचे इशारे मिळण्यासाठी दामिनी अॅप डाऊनलोड करा.

चित्र स्वरूपातील माहिती पीडीएफद्वारे बघण्यासाठी येथे क्लिक करा.

 

Jaydevi PS/S.Chitnis/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1677452) Visitor Counter : 127