उपराष्ट्रपती कार्यालय

उपराष्ट्रपतींनी गुरूनानक जयंतीच्या पूर्वसंध्येनिमित्त राष्ट्राला दिल्या शुभेच्छा

प्रविष्टि तिथि: 29 NOV 2020 9:55PM by PIB Mumbai

नवी दिल्ली ,  29 नोव्हेंबर 2020

 

भारताचे उपराष्ट्रपती श्री. एम.वेंकैया नायडू यांनी गुरूनानक जयंतीच्या पूर्वसंध्येनिमित्त राष्ट्राला शुभेच्छा  दिल्या आहेत. त्यांच्या संदेशाचा पूर्ण मजकूर असा आहे,

गुरुनानक देव जी यांच्या जयंतीनिमित्त मी आपल्या देशातील सर्व जनतेला शुभेच्छा देत आहे. शीख धर्म संस्थापक श्री. गुरुनानक देव जी हे आपल्या  थोर जीवनातून सत्य, करुणा आणि नीतीमत्तेचे प्रतीक म्हणून समोर आले आहेत. भारतातील आध्यात्मिक नेते, नीतीमत्ता उपदेशक, सुधारक आणि संत यांच्यात त्यांना वैशिष्ट्यपूर्ण स्थान आहे. त्यांच्या शिकवणीत सार्वत्रिक आवाहन आहे आणि ते आपल्याला करुणा आणि नम्रतेच्या मार्गावर वाटचाल करण्यासाठी प्रोत्साहीत करतील आणि जात,पंथ आणि धर्म कोणताही असला तरीही सर्व मानवजातीबद्दल आदर बाळगण्यासाठी प्रेरित करतील.

गुरूनानक जयंती हा कुटुंबीय आणि मित्रमंडळींसोबत एकत्र येण्याचा आणि साजरा करण्याचा उत्सव असतो.परंतु या वर्षी आलेल्या कोविड-19 या अभूतपूर्व आरोग्य आणीबाणीच्या पार्श्वभूमीवर मी माझ्या सहयोगी नागरीकांना कोविड आरोग्य आणि स्वच्छतेच्या मार्गदर्शक तत्वांचे पालन करत हा उत्सव साजरा करण्याचे आवाहन करत आहे.

या आनंदाच्या प्रसंगी ,मी देशातील ऐक्य आणि शांतीसाठी प्रार्थना करतो.

 

 

M.Chopade/S.Patgaonkar/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(रिलीज़ आईडी: 1677078) आगंतुक पटल : 120
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Manipuri , Punjabi , Tamil