श्रम आणि रोजगार मंत्रालय
औद्योगिक कामगारांसाठी ग्राहक किंमत निर्देशांक (2016=100) ऑक्टोबर 2020
Posted On:
28 NOV 2020 6:37PM by PIB Mumbai
ऑक्टोबर, 2020 मध्ये औद्योगिक कामगारांसाठीच्या (सीपीआय-आयडब्ल्यू) अखिल भारतीय ग्राहक किंमत निर्देशांक 1.4 अंकांनी वाढून 119.5 झाला आहे. 1 महिन्याच्या टक्केवारी बदलाच्या दृष्टीने त्यात सप्टेंबर आणि ऑक्टोबर 2020 मध्ये यात (+) 1.19 टक्के वाढ झाली असून याधीच्या वर्षातल्या याच कालावधीच्या तुलनेत यात (+) 0.93 टक्के वाढ झाली आहे.
सध्याच्या निर्देशांकात कमाल वाढीव दबाव हा अन्न व शीतपेये समूहाकडून (+) 1.29 टक्के होता. तूरडाळ, कुक्कुट (कोंबडी), अंडी (कोंबडी), बकरीचे मांस, मोहरीचे तेल, सूर्यफूल तेल, वांगी, कोबी, गाजर, फ्लॉवर, हिरवी मिरची, दुधी, भेंडी, कांदा, वाटाणे, बटाटा, घरगुती वीज, डॉक्टरांचे शुल्क, बस शुक इत्यादीमुळे निर्देशांकात वाढ झाली. मात्र गहू, मासे , टोमॅटो, सफरचंद इत्यादींनी उंचावणाऱ्या निर्देशांक वाढीला रोखले.
केंद्र स्तरावर डूम-डोमा तिनसुकीया, पटना आणि रामगड येथे प्रत्येकी 4 गुणांच्या वाढीची नोंद झाली. इतरांपैकी 9 केंद्रांमध्ये 3 गुणांची, 24 केंद्रांमध्ये 2 गुण आणि 33 केंद्रांमध्ये 1 गुणांच्या वाढीची नोंद झाली. उर्वरित 19 केंद्रांचे निर्देशांक स्थिर राहिले.
ऑक्टोबर 2020 मध्ये सर्व वस्तूंवर आधारित वार्षिक चलनवाढीचा दर 5.91 टक्के होता, मागील महिन्यात हा दर 5.62 टक्के होता तर मागील वर्षीच्या याच महिन्यात हा दर 7.62 टक्के होता. त्याचप्रमाणे खाद्यान्न चलनवाढीचा दर 8.21 टक्के होता, तर मागील महिन्यात हा दर 7.51 टक्के आणि गेल्या वर्षीच्या याच महिन्यात 8.60 टक्के होता.

सप्टेंबर आणि ऑक्टोबर 2020 मध्ये अखिल भारतीय गटनिहाय सीपीआय-आयडब्ल्यू
अनु.क्र.
|
गट
|
सप्टेंबर, 2020
|
ऑक्टोबर, 2020
|
I
|
अन्न आणि पेये
|
119.7
|
123.0
|
II
|
पान , सुपारी, तंबाखू आणि मादक पदार्थ
|
131.6
|
132.5*
|
III
|
कपडे आणि पादत्राणे
|
117.6
|
117.4
|
IV
|
गृहनिर्माण
|
113.5*
|
113.5*
|
V
|
इंधन आणि प्रकाश
|
125.6
|
126.4
|
VI
|
इतर
|
116.8
|
117.0
|
|
सामान्य निर्देशांक
|
118.1
|
119.5
|
S.Tupe/S.Mhatre/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1676791)