संरक्षण मंत्रालय

28 नोव्हेंबर 2020 रोजी भारतीय नौदल अकादमीत पासिंग आउट परेड आयोजित

Posted On: 26 NOV 2020 8:23PM by PIB Mumbai

नवी दिल्ली ,  26 नोव्हेंबर 2020

भारतीय नौदल अकादमी (आयएनए), एळीमला, येथे 28 नोव्हेंबर 2020 रोजी पासिंग आउट परेड (पीओपी) संपन्न होणार आहे. कोविड-19 संकट काळात घेतल्या जाणाऱ्या सावधगिरीचा विचार करून प्रशिक्षणार्थीचे पालक व पाहुण्यांच्या उपस्थितीशिवाय पीओपीचे आयोजन करण्यात येत आहे. भारतीय नौदल अकादमी अभ्यासक्रम (बीटेक आणि एमएससी) आणि 30 व्या नौदल अभिमुखता अभ्यासक्रमाच्या(विस्तारित) कॅडेट्सचे  प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण झाल्यानंतर ते  अधिकारी म्हणून पास होतील. श्रीलंका नौदलाचे दोन प्रशिक्षणार्थी देखील हे प्रशिक्षण पूर्ण करतील.

27 नोव्हेंबर 2020 रोजी दीक्षांत समारंभात भारतीय नौदल अकादमीच्या चार वर्षांच्या बी.टेक पदवी अभ्यासक्रमाच्या प्रशिक्षकांना उपाध्यक्ष अ‍ॅडमिरल एम ए हंपीहोली, एव्हीएसएम, एनएम, कमांडंट, आयएनए यांच्या हस्ते पदवी प्रदान करण्यात येईल. पासिंग आऊट कोर्सचे रियर   एडमिरल तरुण सोबती, व्हीएसएम, डेप्युटी कमांडंट आणि मुख्य प्रशिक्षक, आयएनए यांनी 25 नोव्हेंबर 2020 रोजी निष्ठेची शपथ दिली. देशातील शूर सैनिकांच्या बलिदानांच्या स्मरणार्थ 25 नोव्हेंबर 2020 रोजी आयएनएचे युद्ध स्मारक प्रेरणा स्थान येथे पुष्पहार अर्पण सोहळा आयोजित करण्यात आला. प्रशिक्षणार्थी आणि आयएनए बँड यांनी 26 नोव्हेंबर 2020 रोजी एक नेत्रदीपक  प्रात्यक्षिक देखील सादर केले.

जनरल मनोज मुकुंद नरवणे, पीव्हीएसएम, एव्हीएसएम, एसएम, व्हीएसएम, एडीसी, लष्कर प्रमुख 28 नोव्हेंबर 20 रोजी पासिंग आउट परेडचे पुनरावलोकन अधिकारी असतील.

 

M.Chopade/S.Mhatre/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1676204) Visitor Counter : 133


Read this release in: English , Urdu , Hindi , Tamil