कृषी मंत्रालय

नरेंद्र सिंह तोमर यांनी केले सहकार प्रज्ञाचे अनावरण


45 नव्या माँड्यूल्स मधून प्रार्मिक सहकारी संस्थांना करणार प्रशिक्षित

सहकार क्षेत्राने गावे आणि गरीब शेतकऱ्यांना आत्मनिर्भर करण्यात सहभाग घ्यावा

Posted On: 24 NOV 2020 10:32PM by PIB Mumbai

 

केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण, ग्रामविकास, पंचायत राज्य आणि खाद्यान्न प्रक्रिया उद्योग मंत्री श्री. नरेंद सिंह तोमर यांनी आज सहकार प्रज्ञाचे अनावरण  केले. राष्ट्रीय सहकार विकास महामंडळ (NCDC) आणि Linac  अर्थात लक्ष्मणराव इनामदार राष्ट्रीय सहकार संशोधन आणि विकास अकादमी  यांच्या सहकार्याने  नव्या  45 प्रशिक्षण  माॅड्यूल्सद्वारे देशातील  ग्रामीण भागातील प्राथमिक सहकारी संस्थांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे.  लक्ष्मणराव इनामदार नॅशनल कोआँपरेटीव्ह रीसर्च अँड डेव्हलपमेंट अँकेडेमी Linac,  यांच्या समर्पित सहकार्याने आणि एनसीडीसीने दिलेल्या संपूर्ण निधीतून  देशभरात 18 प्रादेशिक प्रशिक्षण केंद्रे स्थापन झाली असून त्या केंद्रांच्या विस्तारीत जाळ्यामुळे एनसीडीसीची क्षमता 18 पट वाढून त्याला सहकार प्रज्ञा या स्वरूपात मूर्त स्वरूप प्राप्त झाले आहे.

यावेळी बोलताना श्री. नरेंद्र सिंग तोमर यांनी गरीब-शेतकरी यांना आत्मनिर्भर करण्यासाठी मोठी भूमिका बजावण्याचे आवाहन सहकार क्षेत्राला केले. श्री. तोमर म्हणाले की भारतात सहकारी सोसायट्यांचे विशाल जाळे पसरलेले असून ,त्यात  8.50 लाख सहकारी सोसायट्या असून त्यांचे सुमारे 290 दशलक्ष सदस्य आहेत आणि भारतातले  94% शेतकरी एखाद्या तरी सहकारी सोसायटीचे सदस्य असतात.भारताला आत्मनिर्भर करण्यात सहकार चळवळीची  मोठी भूमिका असून त्यामुळे कृषी क्षेत्र आणि संबंधित क्षेत्रातील जोखीम कमी करण्यासाठी ती शेतकऱ्यांना सबळ करते तसेच नीतीभ्रष्ट व्यापाऱ्यांच्या शोषणाविरुद्ध ढाल म्हणून कार्य करते.

  

श्री. तोमर पुढे असे म्हणाले की देशात 2.33 लाखांपेक्षा जास्त ग्रामपंचायती आहेत, ज्यांच्या द्वारे सरकार प्रत्येक घरात शौचालय, वीज, पाणी, स्वयंपाकाचा गॅस,अशा सारख्या मूलभूत सुविधा उपलब्ध करणे सुनिश्चित करण्यासाठी प्रयत्नशील आहे. श्री. तोमर यांनी सांगितले की, 85%शेतकरी अल्पभूधारक असून ते स्वतःच्या  शेतीमध्ये गुंतवणूक करू शकत नाहीत, त्यांच्यासाठी  गावपातळीवर शीतगृहासारख्या सुविधा निर्माण करण्यावर सरकार लक्ष केंद्रित करत आहे, ज्यामुळे शेतकऱ्यांना आपले उत्पादन कमी किंमतीत विकायला भाग पडणार नाही.

श्री. तोमर म्हणाले की एनसीडीसी एक आर्थिक शक्तीस्थान म्हणून उदयास आले असून, आपल्या सदस्य सहकारी संस्थांना ते विस्तृत विविध उत्पादने आणि  सेवा पुरविते.आतापर्यंत त्यांनी देशभरातील विविध संवर्गातील सहकारी संस्थाना 1.58 लक्ष कोटी रुपयांचे कर्ज उपलब्ध केले आहे.सहकार प्रज्ञा ही एनसीडीसीच्या शेतकरी केंद्रस्थानी ठेवून  घेतलेल्या निर्णयाचा एक  भाग आहे.

ही सहकार प्रज्ञाची 45 प्रशिक्षण माँड्यूल्स लक्ष्मणराव इनामदार राष्ट्रीय सहकार संशोधन आणि विकास अकादमीच्या वतीने वितरित केली जातील आणि त्यांच्या देशभरातील प्रादेशिक प्रशिक्षण केंद्राच्या जाळ्यांमार्फत देशातील प्राथमिक सहकारी संस्थांना आणि कृषी उत्पादन संघटना, तसेच स्वमदत गटांच्या संघांमार्फत राबविले  जातील. प्रशिक्षण कार्यक्रमांना एनसीडीसीच्या योजनेद्वारे सहाय्य केले जाईलतसेच भारताच्या योजनेतील  10000 एफपीओजना,भारत सरकारची अँग्री इन्फ्रा निधी योजनाखाद्यान्न  प्रक्रिया मंत्रालयाची पीएम-एफएमई योजना, भारत सरकारची डेअरी ईन्फ्रा  फंड योजनाभारत सरकारची मत्स्यपालन इन्फ्रा  फंड योजना ,पंतप्रधान मत्स्यसंवर्धन योजना, ग्रामीण विकास मंत्रालयाची ग्रामीण  योजना राज्य/केंद्रशासित प्रदेश योजनांना या प्रशिक्षणात सहाय्य  केले जाईल.

राष्ट्रीय सहकार विकास महामंडळाची निर्मिती सहकारी तत्वावर कृषी उत्पादने, अन्नपदार्थ, औद्योगिक वस्तू, पशुधन आणि उत्पादने यांच्यावर  प्रक्रियाविपणनसाठवणूक, निर्यात आणि आयात आणि निर्यात करणे तसेच रुग्णालयआरोग्यसेवा आणि शिक्षणातील  काही उत्पादने आणि सेवा यांचे यांचे नियोजन करणे आणि प्रोत्साहन देणे यासाठी झालेली आहे. ती प्राथमिक ,जिल्हा आणि शिखर/ बहुराज्य अशा तीनही  स्तरांवर आर्थिक सहाय्य पुरवित असते.

निधी आणि प्रकल्पांसाठी देशभरातील सर्व सहकारी संस्थांना मदतीचा हात पुढे करण्यासाठी प्रसिद्ध असलेली राष्ट्रीय सहकार विकास महामंडळ, सहकार क्षेत्रासाठी नाविन्यपूर्ण उपाययोजना करण्यात नेहमीच अग्रेसर राहिली आहे. आपल्या अनेक उपक्रमांच्या मालिकेतील एक म्हणून, युवकांनी सहकार चळवळीत सहभागी व्हावे यासाठी एनसीडीसीने, सहकार कूपट्यूब एनसीडीसी चँनेल या आधीच सुरू केले आहे. सहकार चळवळीच्या क्षेत्रात नवी संजीवनी  आणि समर्पितता आणण्यासाठी राज्यात, प्रातांत, जिल्ह्यात नवीन सहकारी संस्था उभी करणे ही यातील पूर्व अट आहे.एनसीडीसीचे  वेगवेगळ्या भाषांतील 18 राज्यांतील त्यांच्या स्थानिक आवश्यकतेनुसार बनविलेल्या सहकार कूपट्यूब वरील मार्गदर्शक व्हिडीओजनी भारत सरकारच्या महत्वाच्या  योजनांना बळकटी देऊन 10000 कृषी उत्पादन संघटना स्थापन झाल्या.

पंतप्रधान श्री.नरेंद्र मोदी यांच्या शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या, स्टँड अप इंडिया आणि स्कील इंडिया अशा संकल्पनांना पुढे नेण्यासाठी एनसीडीसीने यापूर्वीच  काही  उपक्रम सुरू केले असून आकांक्षित जिल्ह्यांसह 222 जिल्ह्यांत सहकार क्षेत्राचे संवर्धन करणे  ,सहकार मित्र योजना- कार्यानुभव योsजना ,युवा सहकार_- सहकार क्षेत्रातील स्टार्ट अप, आयुष्यमान सहकार-आरोग्य क्षेत्रात पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी योजना अशा सहकार-22 या सारख्या योजना विकसित केल्या आहेत.

 

Jaydevi PS/S.Patgoankar/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1675738) Visitor Counter : 231


Read this release in: English , Urdu , Tamil