कायदा आणि न्याय मंत्रालय
आभासी न्यायालय आणि ई-चलन प्रकल्प आसाममध्ये सुरू; महाराष्ट्रालाही दुसरे आभासी न्यायालय मिळाले
देशभरामध्ये 9 आभासी न्यायालयांचे कार्य सुरू
7 आभासी न्यायालयांमधून 30 लाखांपेक्षा जास्त प्रकरणांचा निपटारा करण्याचे काम सुरू; 10 लाखांपेक्षा जास्त प्रकरणांमध्ये 9 नोव्हेंबरपर्यंत ऑनलाइन दंड म्हणून 123 कोटींहून अधिक रक्कम जमा
Posted On:
20 NOV 2020 10:04PM by PIB Mumbai
नवी दिल्ली , 20 नोव्हेंबर 2020
आसामचे मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल यांच्या हस्ते आसाममध्ये अलिकडेच (दि.12 नोव्हेंबर,2020 रोजी) आभासी न्यायालय(वाहतूक) आणि ई-चलन प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. गुवाहाटी उच्च न्यायालयाची आयसीटी म्हणजेच माहिती आणि दूरसंचार तंत्रज्ञान समिती आणि आसाम सरकार तसेच आसाम पोलिस यांच्या संयुक्त सहकार्याने सुरू करण्यात आलेल्या या प्रकल्पातून खटल्यांचा निपटारा केला जात आहे. महाराष्ट्रातही ‘न्याय कौशल’ या नावाने दुसरे आभासी न्यायालय सुरू करण्यात आले असून त्याचे उद्घाटन नागपूरच्या न्यायिक अधिकारी प्रशिक्षण संस्थेमध्ये दि. 31, ऑक्टोबर 2020 रोजी भारताचे सरन्यायाधीश अरविंद बोबडे आणि सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती डी.वाय. चंद्रचूड यांच्या हस्ते करण्यात आले.
केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्यावतीने ई-चलन हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. यामध्ये एनआयसीने विकसित केलेल्या सॉफ्टवेअरनुसार वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांना इलेक्ट्रॉनिक पद्धतीने ई-चलन पाठवले जाते.
सर्वोच्च न्यायालयाने पुढाकाराने कायदा आणि न्याय मंत्रालयाच्या सहकार्याने ई-समिती तयार करण्यात आली असून त्याव्दारे आभासी न्यायालयाचे कामकाज ऑनलाइन चालते. न्यायालयांमध्ये प्रत्यक्ष न्यायाधीशांना येऊन बसण्याऐवजी ते कार्य संगणकीय अल्गोरिदमनुसार केले जाते . या आभासी न्यायालयाचे कार्यक्षेत्र संपूर्ण राज्यभर विस्तारले जाऊ शकते. तसेच सातही दिवस आणि दिवसाचे 24 तास न्यायालयाचे कामकाज चालवून खटल्यांचा निपटारा करणे शक्य आहे. तसेच दिलेल्या निर्णयानुसार दंड अथवा नुकसान भरपाईची रक्कम ऑनलाइन भरणे शक्य होणार आहे. आभासी न्यायालय ही एकल प्रक्रिया असल्यामुळे इथे युक्तिवाद करण्याची गरज असलेले खटले सुनावणीसाठी येणार नाहीत .
न्यायालयीन प्रकरणांचा निपटारा त्वरेने होत असल्यामुळे नागरिक आणि न्यायालयीन अधिकाऱ्यांची कार्यक्षमता वाढण्यास मदत होणार आहे. तसेच यामुळे वाहतूक पोलिस विभागावर अधिक जबाबदारी येणार असून गैरव्यवहाराला आळा बसेल, परिणामी लोकांचे जीवन अधिक सुकर होईल. आसाममध्ये आभासी न्यायालयामध्ये सुमारे 10 न्यायाधीशांचे कार्य केवळ एक न्यायाधीश करू शकणार आहेत. उर्वरित 9 न्यायाधीश आता इतर न्यायालयीन काम करू शकणार आहेत.
दिल्लीमध्ये दि. 26 जुलै, 2019रोजी तर हरियाणामध्ये 17 ऑगस्ट 2019 रोजी आभासी न्यायालयांचे कामकाज सुरू झाले. यामध्ये प्रारंभी वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांना पाठवलेल्या चलनाची प्रकरणे हाताळण्यात आली. सध्या भारतामध्ये 9 आभासी न्यायालये कार्यरत आहेत. या सर्व न्यायालयांमध्ये वाहतूक चलन विषयक खटले हाताळण्यात येतात. आत्तापर्यंत देशातल्या 7आभासी न्यायालयांमध्ये 30 लाखांपेक्षा जास्त खटले चालविण्यात आले आहेत. त्यामधून शिक्षेस पात्र असलेल्या 10 लाखांपेक्षा जास्त प्रकरणांतल्या दोषींकडून 123 कोटी रुपये दंडाची वसुली ऑनलाइन पद्धतीने झाली आहे.
आभासी न्यायालयांमध्ये दाखल करण्यात आलेल्या खटल्यांचा तपशील (दि. 9 नोव्हेंबर, 2020 पर्यंतची आकडेवारी )
State
|
Challans received
|
Proceedings done
|
Challans in which fine is paid
|
Fine collected
|
contested
|
Delhi
|
1,363,516
|
1,342,001
|
907,206
|
1,115,201,287
|
58,440
|
Delhi NBT
|
1,726,155
|
1,670,402
|
150,057
|
107,747,802
|
5,065
|
Haryana
|
7,157
|
1,553
|
124
|
109,001
|
10
|
Maharashtra (Pune traffic department)
|
4,811
|
4,790
|
324
|
64,801
|
11
|
Tamil Nadu
|
35,777
|
34,915
|
3,052
|
13,495,440
|
162
|
Kerala
|
1,648
|
1,027
|
118
|
184,501
|
4
|
Karnataka
|
6612
|
6,569
|
3,731
|
992,640
|
75
|
TOTAL COUNT
|
3,145,676
|
3,061,257
|
1,064,612
|
1,237,795,472
|
63,767
|
आसाम आणि नागपूर येथे अगदी अलिकडेच आभासी न्यायालयाचे कामकाज सुरू झाले आहे,त्यामुळे त्यांच्या खटल्यांचा तपशील सध्या उपलब्ध नाही.
Jaydevi P.S./S.Bedekar/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1674589)
Visitor Counter : 599