भारतीय स्पर्धा आयोग
ग्रीनको एनर्जी होल्डिंग्स (GEH) ला ओरीक्स कॉर्पोरेशन (ओरीक्स) कडून ओरीक्स विंड एसपीव्ही ओरीक्स हस्तांतरित करण्यास आणि GEH मध्ये ओरीक्सला समभाग घेण्याची भारतीय स्पर्धा आयोगाची परवानगी
Posted On:
12 NOV 2020 8:35PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 12 नोव्हेंबर 2020
भारतीय स्पर्धा आयोगाने स्पर्धा कायदा 2002 च्या कलम 31(1)अंतर्गत आज ग्रीनको एनर्जी होल्डिंग्स (GEH) ला ओरीक्स कॉर्पोरेशन (ओरीक्स) कडून ओरीक्स विंड एसपीव्ही ओरीक्स हस्तांतरित करण्यास आणि GEH मध्ये ओरीक्सला समभाग घेण्यास मंजुरी दिली आहे.
ग्रीनको ग्रुप ऑफ कंपनीज जी GEH ही होल्डिंग कंपनी आहे. GEH च्या भारतातील उपकंपन्यांची मुख्य व्यावसायिक जबाबदारी, उर्जानिर्मिती प्रकल्प विकत घेणे, विकसित करणे, बंधने आणि त्यांचे व्यवस्थापन करणे ही आहे.
ओरीक्स ही ओरिक्स ग्रुप ऑफ कंपनीज ची होल्डिंग कंपनी आहे. ही कंपनी विविध प्रकारच्या सेवा देते, यात कॉर्पोरेट वित्तीय सेवा (आर्थिक मदत, भाड्याने देणे तसेच छोट्या आणि मध्यम आकाराच्या कंपन्यांच्या समस्यांवर तोडगा शोधणे) व्यवस्थापन करार (वाहने भाड्याने देणे, इत्यादि.) बांधकाम व्यावसायिक, खाजगी इक्विटी गुंतवणूक, आयुर्विमा, बँकिंग आणि क्रेडीट, मालमत्ता व्यवस्थापन, पर्यावरण आणि उर्जा (उर्जानिर्मितीसह) अशाप्रकारच्या सेवा देते.
ओरीक्स विंड एसपीव्ही या ओरीक्सच्या उपकंपन्या आहेत ज्या मुख्यत्वे उर्जानिर्मिती आणि इतर संलग्न सेवांशी संबधित आहेत.
या कंपन्यांच्या समन्वयातून, GEH ला ओरीक्स कडून ओरीक्स विंड एसपीव्हीच्या समभागांमध्ये हिस्सा मिळेल आणि ओरीक्सला GEH मध्य इक्विटी हिस्सा मिळेल.
* * *
G.Chippalkatti/R.Aghor/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1672397)
Visitor Counter : 163