विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय

भारतीय वैज्ञानिकांनी भुईमुगाच्या टरफलांपासून विकसित केल्या उर्जासक्षम स्मार्ट स्क्रीन्स

Posted On: 12 NOV 2020 6:25PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 12 नोव्‍हेंबर 2020

 

भारतीय वैज्ञानिकांनी पर्यावरण स्नेही स्मार्ट स्क्रीन विकसित केला  असून हा  स्क्रीन खाजगीपणाचे  संरक्षण करण्याबरोबरच   यातून बाहेर पडणारा प्रकाश आणि उष्णता नियंत्रित करुन, उर्जा संवर्धन देखील करतो. यामुळे वातानुकूलनाचा भारही कमी लागतो. विशेष म्हणजे हा स्मार्ट स्क्रीन भुईमुगाच्या टाकावू शेंगांपासून बनवण्यात आला आहे.

विज्ञान आणि तंत्रज्ञान संस्थेच्या अखत्यारीत असलेल्या बंगळूरूच्या ‘नैनो अँड सॉफ्ट मॅटर सायन्स’ (CeNS), या स्वायत्त संस्थेतील प्रा. एस. कृष्णप्रसाद यांच्या नेतृत्वाखालील संशोधकांच्या एका गटाने, डॉ. शंकर राव यांच्यासह,भुईमुगाच्या टरफलांपासून हे सेल्युलाईड आधारित स्मार्ट स्क्रीन बनवले आहेत.

या स्मार्ट स्क्रीन अॅप्लीकेशन मध्ये द्रव स्फटिक रेणू  आणि पॉलीमर मेट्रिक्स  एकत्रित करण्यात आले आहेत. नैनोस्फटिक सेल्युलोस चा वापर करुन हे मेट्रिक्स तयार करण्यात आले आहेत आणि हे सेल्युलोज भुईमुगाच्या टरफलांपासून तयार करण्यात आले आहेत. आयआय टी रूडकी येथील प्रो युवराज सिंग नेगी यांच्या चमूने हे सेल्युलोज तयार केले आहेत.

त्यांनी विकसित केलेले हे उपकरण अप्लाईड फिजिक्स चा भाग आहे. पॉलीमर आणि द्रव स्फटिक योग्य प्रमाणात एकत्र झाल्यास त्यांच्या एकत्रित गुणधर्मातून स्मार्ट स्क्रीनसाठी आवश्यक ते ऑप्टीकल गुणधर्म तयार होतात.

हे उपकरण कोणत्याही कृषी टाकावू वस्तूपासून तयार केले जाऊ शकते, मात्र भुईमुग टरफलाच्या कचऱ्यापासून तयार झालेले, स्मार्ट स्क्रीन अतिशय प्रभावी असल्याचे आढळले आहे.

या स्क्रीन मुळे आपले खाजगीपण तर जपले जातेच, त्यशिवाय उर्जा संवर्धनासाठी देखील त्याचा उपयोग होतो. उदाहरणार्थ, एखाद्या खिडकीच्या काचेला ही स्मार्ट स्क्रीन लावली, तर ती काच पारदर्शक राहील, मात्र त्यातून येणारे विकिरण, अतिरिक्त  प्रकाश आणि उष्णता यामुळे नियंत्रित ठेवता येईल. यामुळे आतला भाग गार राहू शकेल.

(Publication link: DOI: 10.1063/5.0020982)

* * *

Jaydevi PS/R.Aghor/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1672339) Visitor Counter : 187