कृषी मंत्रालय
खरीप हंगाम 2020-21 मध्ये किमान हमीभावानुसार झालेली कृषी उत्पादन खरेदी
एकूण धानखरेदीच्या 70.66% इतकी म्हणजेच 166.97 मेट्रिक टन धानखरेदी एकट्या पंजाबमधून
Posted On:
06 NOV 2020 6:51PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 6 नोव्हेंबर 2020
वर्ष 2020-21 मधील खरीप विपणन हंगामात सरकार शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात हमीभावाने धान्यखरेदी करत आहे.

राज्यांकडून आलेल्या प्रस्तावांनुसार, या हंगामात, केंद्र सरकारने महाराष्ट्रासह दहा राज्यांना 45.10 लाख मेट्रिक टन डाळी आणि तेलबियांची हमीभावाने खरेदी करण्यासाठी परवानगी दिली आहे. इतर राज्यांकडून असे प्रस्ताव आल्यानंतर त्यांनाही त्याची परवानगी दिली जाईल.
5 नोव्हेंबर 2020 पर्यंत, केंद्र सरकारने आपल्या नोडल संस्थेच्या माध्यमातून, 27,105 लाख मेट्रिक टन मूग, उडीद, भुईमुगाच्या शेंगा आणि सोयाबीनची खरेदी हमीभावानुसार केली आहे. 145 कोटी रुपयांच्या या खरेदीचा लाभ महाराष्ट्र, गुजरात, हरियाणा आणि राजस्थान मधील 16,387 शेतकऱ्यांना झाला आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा डाळी आणि तेलबियांच्या खरेदीत 72.64% ची वाढ झाली आहे.

खरीपातील धानखरेदी सगळीकडे मोठ्या प्रमाणात आणि निर्वेधपणे सुरु आहे. एकट्या पंजाब राज्यातून आतापर्यंत 166.97 लाख मेट्रिक टन धानखरेदी झाली असून, ती एकूण धानखरेदीच्या 70.66% इतकी आहे.

आतापर्यंत 44,612 कोटी रुपयांची धान्यखरेदी करण्यात आली असून त्याचा लाभ 19.98 लाख शेतकऱ्यांना मिळाला आहे.

* * *
M.Chopade/R.Aghor/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1670735)
Visitor Counter : 118