उपराष्ट्रपती कार्यालय

संगीत आणि नृत्य आपले जीवन अधिक परिपूर्ण बनवतात, ते आपल्याला अंधकार आणि निराशा दूर करण्यात मदत करतात - उपराष्ट्रपती


संगीत आणि नृत्य साथीच्या आजारामुळे उद्‌भवणारी चिंता दूर करू शकतात आणि आपल्या जीवनात सुसंवाद आणू शकतात

प्राचीन काळापासून भारताला संगीत आणि नृत्याची एक वैभवशाली परंपरा आहे - उपराष्ट्रपती

परंपरा मालिका 2020- राष्ट्रीय संगीत आणि नृत्य महोत्सव ’ च्या आभासी महोत्सवाचा केला शुभारंभ

संगीत आणि नृत्य कोविड -19 महामारीमुळे उद्‌भवणाऱ्या चिंते पासून दिलासा देऊ शकतात असे उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांनी म्हटले आहे

Posted On: 27 OCT 2020 9:41PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 27 ऑक्टोबर 2020

संयुक्त राष्ट्राच्या सहकार्याने नाट्य तरंगिणी यांनी आयोजित  केलेल्या  'परंपरा मालिका 2020- राष्ट्रीय संगीत आणि नृत्य महोत्सवच्या व्हर्च्युअल महोत्सवाचे आज उद्‌घाटन करताना उपराष्ट्रपती म्हणाले की संगीत आणि नृत्य आपल्या जीवनात चैतन्य   निर्माण करून  आपले जीवन अधिक परिपूर्ण बनवतात.  ते   आपल्या जीवनात समरसता आणतात आणि अंधकार आणि निराशा  दूर  करून आपल्या आंतरिक आत्म्याला समृद्ध करतात  असेही ते म्हणाले.

गेल्या 23 वर्षांपासून सातत्याने परंपरा  मालिका’ आयोजित केल्याबद्दल आणि 24 व्या वर्षी अशा प्रकारच्या कठीण परिस्थितीत हे घडवून आणण्यासाठी नाविन्यपूर्ण प्रयत्नांचा अवलंब केल्याबद्दल त्यांनी नाट्य तरंगिणीचे कौतुक केले.  ‘परंपरा’, एका पिढीतून दुसऱ्या पिढीपर्यंत सांस्कृतिक खजिन्याचे संक्रमण असल्याचे त्यांनी नमूद केले.

नायडू म्हणाले की हा नृत्य आणि संगीत महोत्सव साजरा करण्यासाठी यापेक्षा चांगला काळ कधीच  नव्हता कारण लॉकडाऊन, आर्थिक मंदी आणि साथीच्या आजारामुळे  सामाजिक सुसंवादाचा अभावामुळे सामान्य जीवन  प्रभावित  झाले आहे.

या महोत्सवाचे आयोजन आज जागतिक दृक्श्राव्य वारसा दिनानिमित्त होत असल्याचे त्यांनी सांगितले.

सामवेद आणि भरतमुनींच्या नाट्यशास्त्राचा उल्लेख करताना उपराष्ट्रपती म्हणाले की, संगीत आणि नृत्य ही भारताची वैभवशाली परंपरा आहे. ते म्हणाले की, नृत्य, संगीत आणि नाटकांचे भारतातील विविध कला आमचे समान सभ्य तत्वज्ञान आणि सुसंवाद, ऐक्य आणि एकता यासारख्या मूल्यांचे प्रतिनिधित्व करतात. भक्ती, अध्यात्म यावरही विशेष लक्ष केंद्रित केले आहे आणि नऊ ‘राशी ’ मानवी अस्तित्वाची  संपूर्ण अभिव्यक्ती आहे, असेही ते म्हणाले.

उपराष्ट्रपती म्हणाले की आपण आपल्या पारंपारिक खजिन्यांचा सतत आढावा घेऊन नूतनीकरण केले पाहिजे. परंपरा  टिकवून ठेवण्यासाठी शिक्षण व्यवस्थेत या घटकांचा पद्धतशीरपणे समावेश करण्याचीही गरज त्यांनी व्यक्त केली.

परफॉर्मिंग आर्ट्सला अभ्यासक्रमाचा अनिवार्य भाग बनवल्यामुळे  विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढेल,  छुप्या कलागुणांना वाव मिळेल, आणि सर्जनशीलता वाढेल असे ते म्हणले.

सुरक्षित आणि हरित गृह भविष्यातील पिढ्यांपर्यंत पोहोचवणे आपले कर्तव्य आहे यावर भर देताना नायडू म्हणाले की भारतीय संस्कृती आणि सभ्य संस्कारांनी निसर्ग आणि सर्व सजीव वस्तूंसह सुसंवादी सह-अस्तित्वाचे महत्त्व नेहमीच स्पष्ट केले आहे. प्राचीन काळापासून आपल्या  संस्कृतीत  निसर्गाबद्दल आदर आहे आणि पर्यावरणाला  अनुकूल प्रवृत्ती जोपासत आहे  असेही ते म्हणाले.

सार्वजनिक-खाजगी-भागीदारी ही काळाची गरज असल्याचे सांगत उपराष्ट्रपतींनी सर्व उद्योग नेत्यांनी कला, संस्कृती आणि क्रीडा यांना प्रोत्साहन द्यावे आणि चांगल्या भविष्यासाठी भारताची नवीन पिढी सुसज्ज करावी असे आवाहन केले.

B.Gokhale/S.Kane/P.Malandkar

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1667991) Visitor Counter : 183