ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक पुरवठा मंत्रालय
खरीप विपणन हंगाम 2020-21 किमान आधार मूल्याने झालेले व्यवहार
जवळपास 12.98 लाख शेतक-यांना खरीप विपणन हंगामातल्या व्यवहारांमुळे लाभ
Posted On:
26 OCT 2020 6:22PM by PIB Mumbai
यंदाच्या म्हणजे खरीप विपणन हंगाम 2020-21मध्ये सरकारने मागील हंगामाप्रमाणेच सध्याच्या किमान आधारभूत मूल्याने शेतक-यांडून धान्य खरेदी करण्याची योजना सुरू ठेवली आहे.
खरीप 2020-21 मध्ये तांदळाची खरेदी प्रक्रिया सुरळीत सुरू आहे. पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, तामिळनाडू, उत्तराखंड, चंदिगड, जम्मू आणि काश्मिर, गुजरात आणि केरळ या राज्यांमध्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये दि. 25.10.2020 च्या आकडेवारीनुसार 151.17 लाख मेट्रिक टन तांदळाची खरेदी झाली. गेल्यावर्षी या काळामध्ये 125.05 लाख मेट्रिक टन तांदळाची खरेदी झाली होती. गेल्यावर्षीच्या तुलनेत तांदूळ खरेदीमध्ये 20. 89 टक्के वाढ झाली आहे. एकूण 151.17 लाख मेट्रिक टन तांदळाच्या खरेदीपैकी एकट्या पंजाब राज्यात 100.69 लाख मेट्रिक टन तांदूळ खरेदी करण्यात आला. हे प्रमाण एकूण तांदूळ खरेदीच्या 66.719 टक्के आहे. या हंगामामध्ये आत्तापर्यंत 12.98 लाख शेतक-यांना या खरेदीचा लाभ झाला आहे. या शेतक-यांकडून किमान आधार मूल्याने 28,542 कोटी रुपये खर्चून अन्नधान्य खरेदी करण्यात आले आहे.
राज्यांकडून आलेले प्रस्ताव लक्षात घेवून 45.10 लाख मेट्रिक टन डाळी आणि तेलबियांची खरेदी यंदाच्या खरीप विपणन हंगामामध्ये करण्यात आली आहे. तामिळनाडू, कर्नाटक, महाराष्ट्र, तेलंगणा, गुजरात, हरियाणा, उत्तर प्रदेश, ओडिशा, राजस्थान आणि आंध्र प्रदेश या राज्यांच्या प्रस्तावाआधारे ही पीएसएस म्हणजेच मूल्य आधार योजनेनुसार खरेदी करण्यात आली आहे. तसेच आंध्र प्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू आणि केरळ यांच्या प्रस्तावांनुसार 1.23 लाख मेट्रिक टन खोबरे खरेदी करण्यास मंजुुरी देण्यात आली आहे.
दि. 25.10.2020 पर्यंत सरकारच्या नोडल एजन्सीव्दारे धान्य खरेदी करण्यात आले आहे.
आत्तापर्यंत 986.39 मेट्रिक टन मूग आणि उडीद यांची खरेदी करण्यात आली असून त्यासाठी किमान आधार मूल्यानुसार 7.09 कोटी रूपये दिले आहेत. त्याचा लाभ तामिळनाडू, महाराष्ट्र आणि हरियाणाच्या 923 शेतकरी बांधवांना झाला आहे. त्याचप्रमाणे 5.89 मेट्रिक टन खोबरे खरेदी करण्यात आली आहे. त्यासाठी किमान आधार मूल्याने 52.40 कोटी रूपये देण्यात आले. या खरेदीचा लाभ कर्नाटक आणि तामिळनाडूमधल्या 3961 शेतक-यांना झाला आहे.
----------
M.Chopade/S.Bedekar/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1667620)
Visitor Counter : 212