भूविज्ञान मंत्रालय

पश्चिम बंगाल-बांग्लादेश किनारपट्टीपासून दूर बंगाल उपसागराच्या वायव्येकडील भागात कमी दाबाचा पट्टा

Posted On: 23 OCT 2020 4:01PM by PIB Mumbai

 

ओदिशा किनाऱ्यापासून बंगालच्या उपसागराईशान्येकडील कमी दाबाचा पट्टा मागील सहा तासात ताशी 24 किमी वेगाने पश्चिम बंगाल -बांग्लादेश किनारपट्टीपासून दूर  बंगाल उपसागराच्या वायव्येकडे सरकला आहे.

आज दुपारच्या सुमारास तो सुंदरबनमध्ये पश्चिम बंगाल आणि बांगलादेश किनारपट्टी पार करण्याची शक्यता आहे.  त्यामुळे पुढील 24  तासात बंगालच्या उपसागरात ताशी 45-55 किमी वेगाने, उत्तर ओदिशा किनारपट्टीवर ताशी 40-50 किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे.

तसेच त्रिपुरात तुरळक ठिकाणी, नागालैंड, मणिपुर, मिजोरम, दक्षिण आसाम आणि मेघालयमध्ये काही ठिकाणी आज मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

उद्याही आसाम, मेघालय, नागालैंड, मणिपुर, मिजोरम, त्रिपुरा मध्ये अनेक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज आहे.

याकाळात उत्तर बंगाल उपसागरात आणि ओदिशा किनारपट्टी भागात समुद्र खवळलेला राहील, त्यामुळे पुढील 24  तासात मच्छिमारांना समुद्रात न जाण्याचा इशारा देण्यात आला आहे.

 

M.Chopade/S.Kane/P.Kor

***

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1667037) Visitor Counter : 154