आयुष मंत्रालय
माय गव्ह मंचावरील आयुष संजीवनी प्रश्नमंजुषा स्पर्धेद्वारे रोग प्रतिबंधासाठी आयुष उपायांबाबत जनजागृती केली
Posted On:
14 OCT 2020 7:12PM by PIB Mumbai
मायगव्ह मंचावरील राष्ट्रीय स्तरावरील आयुष संजीवनी प्रश्नमंजुषा स्पर्धेच्या विजेत्यांची नावे आज जाहीर करण्यात आली. मे-जून 2020 दरम्यान आयुष मंत्रालयाने ही स्पर्धा आयोजित केली होती.
तीन पारितोषिक श्रेणींमध्ये एकूण नऊ विजेत्यांना गौरवण्यात आले. निशा तामल यांना 25,000 रुपयांचे प्रथम पारितोषिक देण्यात आले. प्रत्येकी 10,000 रुपयांचे दुसरे पारितोषिक डॉ. मृण्मयी, रोहित आणि हिमांशू गुप्ता या तिघांना जाहीर झाले. प्रत्येकी 5000 रुपयांचे तिसरे पारितोषिक एमिली वसंत मनोगरी, डॉ. निधी गर्ग, वेदिका गुप्ता, पूजा गोस्वामी आणि अंशु तिवारी या पाचजणांना देण्यात आले.
कोविड 19 च्या पार्श्वभूमीवर, आयुष संजीवनी प्रश्नमंजुषेने संसर्ग आणि आजार रोखण्यासाठी उपयुक्त अशा आयुष उपायांबाबत जागरूकता निर्माण करण्यावर मोठा प्रभाव पाडला. आयुष मंत्रालयाने सुरू केलेल्या प्रश्नमंजुषा स्पर्धेला देशभरात प्रचंड प्रतिसाद मिळाला. आयुष संजीवनी मोबाईल अॅपला प्रोत्साहन देण्याचे प्रश्नमंजुषेचे विशिष्ट उद्दिष्ट होते, ज्याचा उपयोग कोविड 19 च्या प्रतिबंधक उपयांबाबत आयुष सूचनांना जनतेने दिलेल्या प्रतिसादाचा अभ्यास करण्यासाठी करण्यात आला.
मायगव्ह मंचावर आयोजित प्रश्नमंजुषा स्पर्धेच्या मोहिमेने रंजक अंतर्दृष्टी दिली आहे. सुमारे 45% सहभागी हे 18-24 वयोगटातील जे असे सूचित करतात की समाजातील या गटाने कोविड संदर्भात आयुष उपचारांमध्ये सर्वात जास्त रस घेतला आहे. बहुतांश सहभाग उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, राजस्थान आणि दिल्ली या राज्यांमधून माय गव्ह मंचाच्या माध्यमातून झाला आहे ज्याला सोशल मीडियावरून पाठिंबा देण्यात आला.
मायगव्हवर स्पर्धा आयोजित करण्याव्यतिरिक्त, आयुष संजीवनी ऍपची प्रभावी सेंद्रीय मोहीम आणि ई-संपर्क न्यूजलेटरद्वारे जाहिरात केली गेली. उपलब्ध आकडेवारीनुसार, 23 मे 2020 रोजी ही प्रश्नमंजुषा स्पर्धा सुरू झाल्यावर सर्वाधिक सहभाग नोंदवण्यात आला. महिलांच्या तुलनेत पुरुष सहभागी जास्त होते. हे देखील स्पष्ट झाले आहे की सहभागी झालेल्यांमध्ये विद्यार्थ्यांपासून शेतकरी, व्यापाऱ्यांपासून गृहिणींपर्यंत तसेच इतर प्रकारच्या श्रेणीतील लोक होते.
महामारीच्या काळात केंद्र सरकारच्या आयुष मंत्रालयाने आयुष संजीवनी हे ऍप सुरु केले. सार्वजनिक आरोग्य संशोधन हे ऍप उल्लेखनीय प्रयत्न आहे. सार्वजनिक आरोग्य सुधारण्यासाठी, महामारीच्या परिस्थितीत मंत्रालयाने जारी केलेल्या अधिकृत सूचनांमध्ये समाविष्ट आयुष आधारित पद्धतींच्या प्रभावाचा या ऍप ने अभ्यास केला. रोग प्रतिकारशक्ती वाढवण्याविषयी सांगितलेले सल्ले कोविड 19 महमरीच्या कठीण काळात आले आणि या कठीण प्रसंगी लोकांना आरोग्य समस्या दूर करण्यात मदत केली. आयुष संजीवनीच्या केंद्रस्थानी कोविड -19 प्रतिबंधात्मक सूचनांच्या परिणामाचे मूल्यांकन करण्याचे उद्दीष्ट आहे. आयुष संजीवनी प्रश्नमंजुषेतील सहभागामुळे बर्याच जणांना आयुष प्रणाली आणि विशेषतः सूचनांमधील उपाय समजण्यास मदत झाली आहे.
***
R.Tidke/S.Kane/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1664462)
Visitor Counter : 177