कृषी मंत्रालय

वैभव शिखर परिषदेत, ICAR- भारतीय कृषी संशोधन संस्थेच्या ‘सेन्सर आणि अचूक कृषीसाठी सेन्सिंग’ विषयावर विशेष सत्र


‘अचूक शेती’चा उद्देश सेन्सर, रिमोट सेन्सिंग, डीप लर्निग, कृत्रिम बुद्धिमत्ता यांचा वापर करत भूमी, पिके आणि पर्यावरणाची देखरेख आणि मोजदाद करुन उत्पादकता वाढवणे

Posted On: 06 OCT 2020 10:46PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 6 ऑक्टोबर 2020

वैभव-म्हणजेच वैश्विक भारतीय वैज्ञानिक शिखर परिषदेत, काल ICAR म्हणजेच- भारतीय कृषी संशोधन परिषदेने ‘अचूक शेती’ अंतर्गत, ‘अचूक शेतीसाठी सेन्सर आणि सेन्सिंग’ या विषयावरील सत्र आयोजित केले होते. या परिसंवाद सत्रात एकूण 1019 प्रतिनिधी आणि 38 व्याख्यात्यांनी सहभाग घेतला. वैभव या वैज्ञानिक परिषदेद्वारे भारतीय आणि परदेशी वैज्ञानिक तसेच अभ्यासक यांच्या संमेलनात चर्चा घडवून आणत, देशात विज्ञान तंत्रज्ञान क्षेत्र अधिक भक्कम करणे आणि विविध समस्यांवर तोडगा शोधत, आत्मनिर्भर भारताला पाठबळ देणे, हा केंद्र सरकारचा उद्देश आहे.

या परिषदेत, ‘कृषी अर्थशास्त्र आणि अन्नसुरक्षा’क्षेत्राशी संबंधित एकूण 16 विषयांवर चर्चा होणार आहे. त्यापैकी ‘अचूक कृषीव्यवस्था’ यावरील सत्राचा उद्देश, सेन्सर, रिमोट सेन्सिंग, डीप लर्निग, कृत्रिम बुद्धिमत्ता अशा क्षेत्रातल्या अद्ययावत तंत्रज्ञानावर चर्चा करुन त्याचा जमीन, पिके आणि पर्यावरणावर देखरेख आणि मोजदाद करुन शेतीची उत्पादकता वाढवणे आणि कार्यक्षमता आणि पर्यावरणीय शाश्वततेसाठी त्याचा उपयोग करण्यावर चर्चा झाली. देशातील विविध कृषीसंस्थांचे तज्ञ या सत्रात सहभागी झाले होते.

काही वैज्ञानिकांनी यावेळी कृषीक्षेत्रात सेन्सरचा वापर यावर सादरीकरण देखील केले. या सादरीकरणानंतर प्रत्येक विषयावर परिसंवाद आयोजित करण्यत आला होता.

या चर्चेतून निघालेले निष्कर्ष म्हणजे- 1- भारतात कमी खर्चाचे सेन्सर्स विकसित करणे, ज्यात एकात्मिक प्लॅटफॉर्म, रोबोटिक्स, WSN अशा सुविधा असतील. 2- सेन्सर आधारित तणाव निवारण आणि व्यवस्थापन यासाठी बिग डेटा अॅनालेटीक्स आणि मोडेलिंग, 3 – इमेजिंग आधारित विविध सेन्सरचा UAV च्या  प्रमाणित प्रोटोकॉलचा वापर, ज्या द्वारे पिकांवर 24 तास देखरेख ठेवता येईल, आणि  4—भारतीय कृषीव्यवस्थेसाठी उपयुक्त ठरतील असे वाजवी दरातील तंत्रज्ञान निर्माण करणे. या विचार मंथनातून भारतीय कृषी तंत्रज्ञान व्यवस्थेत असलेल्या त्रुटी दूर करण्याबाबत, अमेरिकेतील काही विद्यापीठांच्या समन्वयातून, शिक्षण आणि क्षमता बांधणी यात सुधारणा करण्यासाठी प्रयत्न केले जावेत अशी एकत्रित भूमिका या चर्चासत्रात मांडण्यात आली.

 

B.Gokhale/R.Aghor/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com(Release ID: 1662196) Visitor Counter : 230


Read this release in: Telugu , English , Urdu , Hindi , Tamil