ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक पुरवठा मंत्रालय
वर्ष 2020-21च्या खरीप हंगामात हरियाणा, पंजाब आणि उत्तर प्रदेश राज्यांतून 1,97,136 मेट्रिक टन धानाची खरेदी
वर्ष 2020-21च्या कापूस हंगामातील कापूस खरेदी हरियाणामध्ये हमी भावाने सुरु
प्रविष्टि तिथि:
02 OCT 2020 8:42PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 2 ऑक्टोबर 2020
पंजाब, हरियाणा आणि उत्तर प्रदेश या तीन राज्यांत 2020-21 साठीची धान खरेदी सुरळीतपणे होत असून, 01.10.2020 पर्यंत 2020-21 च्या खरीप हंगामाची एकूण धान खरेदी 1,97,136 मेट्रिक टन इतकी झाली आहे. याचा एकूण 15,705 शेतकऱ्यांना लाभ झाला असून, आतापर्यंत हमीभावाअंतर्गत देण्यात आलेली एकूण रक्कम रु 372.194 कोटी इतकी आहे. येत्या आठवड्यात धान खरेदीचा वेग वाढणार आहे.
1 ऑक्टोबर पासून कापूस हंगाम सुरु झाला आहे. भारतीय कापूस महामंडळाने हमीभावाने कापूस खरेदीसाठी आपली यंत्रणा सज्ज ठेवली आहे. हरियाणामध्ये हमीभावाने कापूस खरेदी 1 ऑक्टोबर 2020 पासून सुरु झाली आहे.
B.Gokhale/R.Aghor/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1661253)
आगंतुक पटल : 94