संरक्षण मंत्रालय
‘मेक इन इंडिया’ला आणखी चालना: संरक्षण मंत्रालयाचा भारतीय कंपनीशी मल्टी-मोड हँड ग्रेनेड्सच्या पुरवठ्यासाठी 409 कोटी रुपयांचा करार
प्रविष्टि तिथि:
01 OCT 2020 7:05PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 1 ऑक्टोबर 2020
‘मेक इन इंडियाला’ आणखी चालना देण्यासाठी संरक्षण मंत्रालयाच्या अधिग्रहण शाखेने मेसर्स इकॉनॉमिक एक्सप्लोजीव लिमिटेड (सोलार ग्रूप) नागपूर या कंपनीसोबत भारतीय सैन्यदलासाठी 10,00,000 हातगोळ्यांसंदर्भात (मल्टीमोड हँड ग्रेनेड) सुमारे 409 कोटी रुपयांचा आज करार करण्यात आला. नवीन ग्रेनेड सध्या भारतीय सैन्यदल वापरत असलेल्या दुसऱ्या महायुद्धकालीन आराखड्याचे असुन, त्याची जागा नवीन हातगोळे घेतील.
मल्टीमोड हँड ग्रेनेड डिआरडिओ/टर्मिनल बॅलिस्टिक रिसर्च लॅबोरेटरीज (TBRL) यांनी तयार केली आहेत, ज्याचे उत्पादन मेसर्स ईईएल, नागपूर कंपनी करेल. ग्रेनेड्सची एक विशिष्ट रचना आहे, त्यामध्ये ते आक्रमण आणि बचाव अशा दोन्ही परिस्थितीत वापरले जाऊ शकतील. ‘आत्मनिर्भरते’ला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकारचा (डिआरडिओ आणि संरक्षण मंत्रालय) सार्वजनिक-खासगी भागीदारीचा प्रमुख प्रकल्प आहे, ज्यात दारुगोळा तंत्रज्ञानात अत्याधुनिकता आणि 100% स्वदेशी सामग्री वापरण्याचा उद्देश आहे.
* * *
B.Gokhale/S.Thakur/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1660744)
आगंतुक पटल : 209