रसायन आणि खते मंत्रालय

एस. अपर्णा यांनी केंद्रीय औषधनिर्मिती विभागाच्या नव्या सचिव म्हणून पदभार स्वीकारला

Posted On: 01 OCT 2020 5:25PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 1 ऑक्‍टोबर 2020

 

गुजरात केडरच्या 1988 च्या बॅचच्या एस. अपर्णा यांनी केंद्रीय रसायने आणि खत मंत्रालयाच्या औषधनिर्मिती विभागाच्या नव्या सचिव म्हणून पदभार स्वीकारला आहे. यापूर्वीच्या सचिव डॉ. पी.डी. वाघेला 30 सप्टेंबरला निवृत्त झाल्यानंतर एस.अपर्णा यांची त्यांच्या जागी नियुक्ती झाली आहे. एस.अपर्णा यांनी 2017 मध्ये जागतिक बँकेमध्ये  कार्यकारी संचालकपदी नियुक्ती झाल्यावर भारत, बांगलादेश आणि श्रीलंका या देशांचे प्रतिनिधित्व केले. तसेच 2019 मध्ये जागतिक बँकेच्या कार्यकारी संचालक म्हणून वॉशिंग्टन येथे प्रतिनियुक्तीवर काम करीत असताना त्यांना अतिरिक्त मुख्य सचिव पदी बढती मिळाली.

त्यांनी गुजरातच्या मुख्यमंत्र्यांचे मुख्य सचिव म्हणून काही काळ काम केले आहे. केंद्र तसेच राज्य सरकारच्या अर्थ, नियोजन, शहर आणि गृह निर्माण आणि क्षेत्र विकास  तसेच वस्त्रोद्योग अशा अनेक विभागांमध्ये उत्तमरीत्या काम केले आहे.  

 

* * *

B.Gokhale/S.Chitnis/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1660692) Visitor Counter : 120