आयुष मंत्रालय

गांधी जयंतीला निसर्गोपचारावरील वेबीनार मालिकेचे आयोजन

Posted On: 29 SEP 2020 1:44PM by PIB Mumbai

 

आयुष मंत्रालयाच्या अख्यतारीतील पुणे येथील राष्ट्रीय निसर्गोपचार संस्थेने 'स्वावलंबी आरोग्यातून स्वावलंबन' या गांधी तत्वज्ञानावर आधारित वेबीनार मालिकेचे आयोजन केले आहे. महात्मा गांधींचा 150व्या जयंती दिनी म्हणजेच 2 ऑक्टोबर या वेबीनार मालिकेचा प्रारंभ होईल आणि 18 नोव्हेंबर 2020 रोजी म्हणजेच निसर्गोपचार दिनी शेवटचे वेबीनार घेतले जाईल. 

आपणा सर्वांना उपलब्ध असणाऱ्या सुलभ निसर्गोपचार पद्धतीतून स्व-आरोग्याची जबाबदारी हा संदेश हे वेबीनार देतील. प्रात्यक्षिकासह निसर्गोपचार याद्वारे या  पद्धतीबाबत जाणीव निर्माण करणे हा यामागील उद्देश आहे. याचे लाईव चॅट आणि वापरकर्त्यांशी चर्चा या माध्यमातून   फीडबॅक वर्गसुद्धा घेतले जातील.

या आभासी वर्गामुळे अंतरामुळे प्रत्यक्ष उपस्थिती शक्य नसणाऱ्या देशभरातील जिज्ञासूंना या वर्गाला उपस्थिती लावणे शक्य होईल.  सध्याच्या कोविड काळात महत्व असणाऱ्या आरोग्य आणि स्वास्थ्य याबद्दलच्या  गांधीजींच्या विचारांच्या प्रसारासाठी प्रयत्न होतील. स्वतःचे आरोग्य राखणे ही जबाबदारी असल्याचे गांधीजी म्हणत.

आपणा सर्वांना उपलब्ध असणाऱ्या सुलभ निसर्गोपचार पद्धतीतून स्व-आरोग्याची जबाबदारी हा संदेश

ही वेबीनार मालिका देईल. प्रात्यक्षिकासह निसर्गोपचार याद्वारे या  पद्धतीबाबत जाणीव निर्माण करणे हा यामागील उद्देश आहे.

आरोग्यासंबधी महात्मा गांधीजींचा दृष्टीकोन या विषयावर बोलण्यासाठी  वेगवेगळया देशातील अभ्यासकांना या वेबीनारमध्ये आमंत्रित करण्यात आले आहे.  उत्तम सार्वजनिक आरोग्यासाठी विविध आरोग्य पथ्य या बद्दल गांधीजींचा दृष्टीकोन समजून घेण्यासाठी याची मदत होईल.

गांधी रिसर्च फाउंडेशन, गांधी अभ्यास केंद्र , गांधी भवन, गांधी स्मारक निधी इत्यादी गांधीजींच्या संस्थांच्या सहकार्याने या वेबीनारचे आयोजन करण्यात आले आहे. जागतिक शांतीसाठी महात्मा गांधी कॅनेडियन  संस्थाजर्मनीतील गांधी इन्फॉर्मेशन सेंटर, अमेरिकेतील वर्जिनिया तसेच UTS सिडनी येथील महात्मा गांधी सेंटर फॉर ग्लोबल नॉन व्हायोलन्स  या जागतिक संस्थाही यात सहभागी होतील.

2 ऑक्टोबर 2020 पासून सुरू होणाऱ्या या वेबीनार मालिकेचे दर दिवशी 1 सत्र असे 48 दिवस ठराविक वेळी सत्र होऊन 18 नोव्हेंबर 2020ला, म्हणजेच निसर्गोपचार दिनी  समारोप होईल, या दिवशी महात्मा गांधी अखिल भारतीय निसर्गोपचार फाउंडेशन ट्रस्ट या निसर्गोपचार प्रत्येक वर्गातील माणसापर्यंत पोचवणाऱ्या संसथेचे ते तहहयात अध्यक्ष झाले.

या वेबीनारशिवाय महाविद्यालयीन व शालेय विद्यार्थ्यांसाठी प्रश्नमंजूषाही आयोजित केली जाईल. ही वेबीनार मालिका रोगप्रतिकारक शक्तीसाठी आयुषया आयुष मंत्रालयाच्या मोहिमेशी सुसंगत आहे

*****

U.Ujgare/V.Sahajrao /P.Kor

***

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1659996) Visitor Counter : 140