आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
फोर्टीज हेल्थकेअरच्यावतीने आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री अश्विनीकुमार चौबे यांच्या उपस्थितीत सामाजिक दायित्व अंतर्गत 2.5 कोटींचा निधी आयसीएमआरकडे सुपूर्द
Posted On:
26 SEP 2020 6:43PM by PIB Mumbai
खाजगी क्षेत्रातील वैद्यकीय सेवा प्रदाता फोर्टीज हेल्थकेअरच्यावतीने सामाजिक दायित्व अंतर्गत 2.5 कोटींचा निधी आयसीएमआरकडे आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री अश्विनीकुमार चौबे यांच्याकडे त्यांच्या कार्यालयामध्ये सुपूर्द करण्यात आला.
यावेळी प्रदाता फोर्टीज हेल्थकेअरचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी आधिकारी डॉ. आशुतोष रघुवंशी, वरीष्ठ उपाध्यक्ष (कॉर्पोरेट व्यवहार आणि सामाजिक दायित्व) मनू कपिला, एसआरएलचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद कुमार उपस्थित होते. हा धनादेश आयसीएमआरचे महा संचालक प्रा. डॉ. बलराम भार्गव आणि वरिष्ठ आर्थिक सल्लागार राजीव रॉय यांच्याकडे देण्यात आला.
याप्रसंगी मंत्री चौबे म्हणाले, आयसीएमआरने संशोधन क्षेत्रात लक्षणीय कामगिरी केली आहे. ही संस्था केवळ भारतामध्येच सर्वोत्कष्ट आहे,असे नाही तर जगभरामधल्या सर्वोत्कष्ट संशोधन संस्थांमध्ये आयसीएमआरची गणना होते. सध्याच्या कोविड-19 महामारीच्या काळामध्ये वैज्ञानिक रात्रंदिवस अथक परिश्रम करीत आहेत.’’ फोर्टीस रूग्णालयाच्यावतीनेही या काळामध्ये अतिशय बहुमोल कामगिरी केली आहे. त्यामुळे संपूर्ण जगामध्ये अनेकांना त्यापासून प्रेरणा मिळेल, अशी आशा आहे, असेही मंत्री चौबे यावेळी म्हणाले.
****
B.Gokhale/S.Bedekar/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1659382)
Visitor Counter : 169