संरक्षण मंत्रालय

भारत आणि जपान दरम्यान द्विपक्षीय सागरी कवायतींचे (JIMEX 20) पश्चिम किनारपट्टीवर आयोजन

Posted On: 25 SEP 2020 11:00PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 25 सप्‍टेंबर 2020


भारत-जपान चौथ्या जिमेक्स द्विपक्षीय सागरी कवायती, भारतीय नौदल आणि जपान मेरीटाइम सेल्फ-डिफेन्स फोर्स (JMSDF) यांच्यात 26 ते 28 सप्टेंबर दरम्यान उत्तर अरबी समुद्रात पार पडणार आहेत. सागरी सहकार्यावर लक्ष केंद्रीत करुन जिमेक्स कवायतींना 2012 पासून सुरुवात झाली. 2018 मध्ये विशाखापट्टणम येथे मागील कवायती पार पडल्या होत्या.

भारत आणि जपान यांच्यात नौदल सहकार्याची गेल्या काही वर्षांत व्याप्ती वाढली आहे. जिमेक्स-20 दरम्यान प्रगत मोहिमा आणि कवायतींचे नियोजन आहे, हे भारत-जपान संरक्षण संबंध वृद्धिंगत झाल्याचे दर्शवते आणि आंतरराष्ट्रीय नियमांनुसार अधिक सुरक्षित, मुक्त आणि सर्वसमावेशक जागतिक सामाईक कार्य करण्यासाठी दोन्ही सरकारांकडून निरंतर प्रयत्न सुरु असल्याचे निदर्शक आहे.  

जिमेक्स 20 मध्ये सागरी मोहीमांची व्याप्ती, मोठ्या प्रमाणात प्रगत कवायती कौशल्याच्या माध्यमातून उच्च प्रतिची आंतर-कार्यप्रणाली आणि संयुक्त मोहीम  कौशल्यांचे प्रदर्शन सादर करण्यात येईल. बहु-आयामी व्युहात्मक कवायती यात शस्त्रास्त्र गोळीबार, क्रॉस डेक हेलिकॉप्टर ऑपरेशन्स आणि जटील पृष्ठभाग, पाणबुडीरोधक आणि हवाई युद्ध अभ्यासातून दोन्ही नौदलांदरम्यानचा एकत्रित समन्वय मजबूत होईल.  

जिमेक्स 20 तीन दिवस चालणार आहे आणि कोविड-19 पार्श्वभूमीवर ‘विना संपर्क -केवळ-सागरी-स्वरूपात’ आयोजित केले जाणार आहे.

स्वदेशी तंत्रज्ञानाने निर्मित स्टेल्थ विनाशक ‘चेन्नई’, लढाऊ जहाज ‘तरकश’, फ्लीट टँकर ‘दीपक’ हे रिअर अ‍ॅडमिरल कृष्णा स्वामीनाथ यांच्या नेतृत्वाखाली भारतीय नौदलाकडून सादर करण्यात येईल. जपानकडून हेलिकॉप्टर विनाशक ‘कागा’, क्षेपणास्त्र विनाशक ‘इकाझुची’ सादर करण्यात येईल. जहाजांव्यतिरिक्त पी 8I लांब रेंज सागरी गस्त विमान, एकात्मिक हेलिकॉप्टर्स आणि लढाऊ विमाने कवायतीत सहभागी होणार आहेत.  

जीमेक्स 20 दोन्ही नौदलांमधील सहकार्य आणि परस्पर विश्वास वाढवण्यास आणि दोन्ही देशांमधील मैत्रीचे दीर्घकाळचे संबंध दृढ बनवण्यास मदत करेल

 

* * *

B.Gokhale/S.Thakur/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1659229) Visitor Counter : 221


Read this release in: English , Urdu , Hindi , Telugu