इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय

रेझ 2020 - कृत्रिम बुद्धिमत्तेवर महा आभासी शिखर परिषद 5- 9 ऑक्टोबर दरम्यान होणार


पंतप्रधान नरेंद्र मोदी 5 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 7 वाजता ‘सामाजिक सशक्तीकरण 2020 साठी जबाबदार कृत्रिम बुद्धिमत्ता ’ या शिखर परिषदेचे उद्‌घाटन करणार

शिखर परिषदेत जागतिक कृत्रिम बुद्धिमत्ता उद्योगातील प्रतिनिधी चर्चा करणार

Posted On: 24 SEP 2020 9:10PM by PIB Mumbai

नवी दिल्ली,  24 सप्टेंबर  2020

इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय आणि नीती आयोग  कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) वर एक महाआभासी शिखर परिषद  RAISE 2020- 'सामाजिक सशक्तीकरणासाठी जबाबदार कृत्रिम बुद्धिमत्ता ,' 5-9 ऑक्टोबर 2020.दरम्यान आयोजित करणार आहे.  इतर क्षेत्रांबरोबर आरोग्यसेवा, कृषी , शिक्षण आणि स्मार्ट मोबिलिटी यासारख्या क्षेत्रात सामाजिक परिवर्तन, समावेशकता  आणि सशक्तीकरणासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करण्यासाठी अभ्यासक्रम आखणे आणि विचारांची देवाणघेवाण  करण्यासाठी हा जागतिक मंच असेल.

रेझ  2020 शिखर परिषदेत, कृत्रिम बुद्धिमत्तेवर संशोधन, धोरण आणि नवीनता विषयातील प्रतिनिधी आणि तज्ञ जगभरातून सहभागी होतील. मुख्य भाषण आणि  पॅनेल चर्चेत ‘महामारी सज्जतेसाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर, ‘डिजिटायझेशनला नवसंशोधनाची चालना’, ‘सर्वसमावेशक एआय’, ‘यशस्वी नवसंशोधनासाठी  भागीदारी’ इत्यादी सारख्या विविध  विषयांवर ही शिखर परिषद होईल.

रेझ 2020 शिखर परिषदेत कृत्रिम बुद्धिमत्तेशी संबंधित क्षेत्रात काम करणारे काही स्टार्टअप्स  देखील सहभागी होतील.  एआय सोल्यूशन चॅलेंजद्वारे निवडलेले  स्टार्टअप्स 6 ऑक्टोबर 2020 रोजी  एआय स्टार्टअप पिच फेस्टमध्ये सादरीकरण करतील.  तंत्रज्ञान उद्योजकांना आणि स्टार्टअपला  सतत पाठिंबा, मान्यता आणि मार्गदर्शन करण्याचा केंद्र सरकारचा उपक्रम आहे.

शिखर परिषदेविषयी बोलताना  इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाचे सचिव अजय प्रकाश सोनी म्हणाले की, उद्योगांमधील उत्प्रेरक म्हणून कृत्रिम बुद्धिमत्ता उदयास आली आहे आणि विकासाला गती देण्यासाठी परिवर्तनकारी भूमिका बजावू शकते. सामाजिक सबलीकरणाला गती देण्यात कृत्रिम बुद्धिमत्तेच्या भूमिकेची सखोल माहिती ही शिखर परिषद घेईल.  RAISE 2020 मध्ये आरोग्य, कृषी, शिक्षण, कौशल्य, मोबिलिटी, फिन्टेक, संशोधन, सर्वसमावेशक एआय, फ्यूचर ऑफ वर्क, आणि जबाबदार एआय सारखे विषय आहेत.

जगातील तिसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी परिसंस्था , आयआयटी सारख्या प्रसिद्ध विड्नयन आणि तंत्रज्ञान संस्था , मजबूत  आणि सर्वव्यापी डिजिटल पायाभूत सुविधा , दरवर्षी लाखोंच्या संख्येने उत्तीर्ण होणारे पदवीधर लक्षात घेता भारत कृत्रिम बुद्धिमत्तेच्या  विकासाच्या बाबतीत जागतिक स्तरावर जागतिक नेतृत्व बनण्याच्या सुस्थितीत आहे. उद्योग विश्लेषकांचा असा अंदाज आहे की 2035 पर्यंत कृत्रिम बुद्धिमत्ता भारताच्या अर्थव्यवस्थेत 957 अब्ज डॉलर्सची भर घालू शकेल. सबका साथ सबका विकासच्या भावनेतपंतप्रधान  नरेंद्र मोदी यांनी देशाच्या 'एआय फॉर ऑल' या धोरणाचे प्रतिनिधित्व करून सर्वसमावेशक विकासासाठी कृत्रिम बुद्धिमत्ताचा लाभ  उठवण्याची योजना आखली आहे. पंतप्रधानांच्या दूरदृष्टीमुळे  भारत लवकरच कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रातील एक नेतृत्वच  नव्हे तर सामाजिक सशक्तीकरणासाठी एआयला जबाबदारीने कसे निर्देशित करावे हे जगाला दाखवणारे एक मॉडेल म्हणून लवकरच आंतरराष्ट्रीय समुदायासमोर उभा राहील.

शिखर परिषदेविषयी बोलताना नीती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी  अमिताभ कांत म्हणाले, कृषीपासून फिन -टेक आणि आरोग्यापासून पायाभूत सुविधांपर्यंत कृत्रिम बुद्धिमत्ता ही खरोखर परिवर्तनीय शक्ती असू शकते. जगाची एआय प्रयोगशाळा बनण्यासाठी आणि सक्षमीकरणाद्वारे सर्वसमावेशक विकास आणि वाढीसाठी योगदान देण्यासाठी भारत सज्ज आहे. डेटा समृद्ध वातावरण तयार करण्यात मदत करणे हे या परिषदेचे  उद्दीष्ट आहे, जी  जागतिक पातळीवर जीवनात बदल घडवून आणणारी एक पायरी आहे.

RAISE 2020 (http://raise2020.indiaai.gov.in/) एआयचा नैतिकदृष्ट्या विकास आणि वापर करण्याची आवश्यकता याबद्दल जनजागृती करण्यासाठी कल्पनांची देवाणघेवाण सुलभ करेल.

रेझ  2020 बद्दलः

जबाबदार एआयद्वारे सामाजिक परिवर्तन, समावेश आणि सशक्तीकरणासाठी भारताची कल्पना आणि रूपरेषा तयार करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेवर जगभरातील विचारवंतांची RAISE 2020 ही अशा प्रकारची पहिलीच बैठक आहे. इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयासह केंद्र  सरकार द्वारा आयोजित या  कार्यक्रमात जागतिक उद्योग नेते, मुख्य विचारवंत , सरकारी प्रतिनिधी आणि शिक्षणतज्ज्ञांचा मोठा सहभाग असेल.

 

 

B.Gokhale /S.Kane/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1658844) Visitor Counter : 202


Read this release in: English , Hindi , Tamil , Telugu