संरक्षण मंत्रालय
भारत आणि चीन दरम्यान वरिष्ठ कमांडर्स च्या बैठकीच्या सहाव्या फेरीनंतर जारी करण्यात आलेले संयुक्त प्रसिद्धीपत्रक
Posted On:
22 SEP 2020 11:46PM by PIB Mumbai
21 सप्टेंबरला भारत आणि चीनच्या वरिष्ठ कमांडर्स दरम्यान लष्करी कमांडर स्तरीय बैठकीची सहावी फेरी झाली. भारत चीन प्रत्यक्ष सीमारेषेवरील परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी दोन्ही बाजूंमध्ये यावेळी सकस आणि मुद्देसूद चर्चा झाली.दोन्ही देशांच्या नेत्यांमध्ये ज्या ज्या मुद्द्यांवर सहमती झाली आहे, त्या सर्व महत्वाच्या मुद्द्यांची अंमलबजावणी लगेच करण्यावर दोन्ही प्रतिनिधींनी सहमती दर्शवली. त्याशिवाय, प्रत्यक्ष मैदानावर परस्परसंवाद वाढवणे, गैरसमज आणि चुकीचे निष्कर्ष काढण्याचे प्रकार थांबवणे. आघाडीवर आणखी सैन्य कुमक न पाठवणे,प्रत्यक्ष मैदानावरील स्थिती एकतर्फी न बदलणे आणि गुंतागुंत किंवा तणावाची स्थिती निर्माण होईल, अशा कुठल्याही कारवाया न करण्यावर या बैठकीत सहमती व्यक्त करण्यात आली. लवकरच लष्करी कमांडर स्तरीय बैठकीची सातवी फेरी घेतली जाईल, असेही या बैठकीत ठरले. या प्रश्न योग्य तऱ्हेने सोडवण्यासाठी प्रत्यक्ष मैदानावर काही उपाययोजना कराव्यात आणि सीमाभागात शांतता आणि सौहार्द टिकवण्यासाठी काम करावे, असा निर्णयही या बैठकीत घेण्यात आला.
****
B.Gokhale/R.Aghor/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1658092)
Visitor Counter : 154