नागरी उड्डाण मंत्रालय

ड्रोन्ससाठी वैमानिक प्रशिक्षण देण्यासाठी 13 उड्डाण प्रशिक्षण संघटनांना (एफटीओ) डीजीसीएची मंजुरी

Posted On: 22 SEP 2020 10:10PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 22 सप्‍टेंबर 2020


15 सप्टेंबर 2020 पर्यंत, रिमोटली पायलटेड एअरक्राफ्ट सिस्टम (आरपीएएस) किंवा ड्रोनसाठी वैमानिक प्रशिक्षण देण्यासाठी नागरी उड्डाण महासंचालनालयाने (डीजीसीए) 13 उड्डाण प्रशिक्षण संघटनांना (एफटीओ) मंजुरी दिली आहे.

जनतेच्या सूचना  जाणून घेण्यासाठी डीजीसीएच्या संकेतस्थळावर मसुदा नागरी उड्डाण आवश्यकता (सीएआर) कलम 7, मालिका डी, भाग -1 आणि  मसुदा उड्डाण प्रशिक्षण  परिपत्रक (एफटीसी)-2  प्रसिद्ध करण्यात आले आहे. वर  नमूद केलेली सीएआर आणि एफटीसी मंजूर झाल्यावर ते अधिक कंपन्यांना ड्रोन प्रशिक्षण पुरवण्यासाठी परवानगी मिळवण्यासाठी प्रोत्साहित करेल.

15 सप्टेंबर 2020 पर्यंत, 13 एफटीओना ड्रोन पायलट प्रशिक्षण देण्याची परवानगी देण्यात आली आहे. त्यांना परवानगी देण्यामागे विमान उड्डाण  सुरक्षा  पैलूशी ओळख, नियामक यंत्रणा, मानव चालित विमानावर वैमानिकांना प्रशिक्षण देण्याचा अनुभव, उपकरणे, प्रशिक्षक, आवश्यक पायाभूत सुविधा वगैरेंची उपलब्धता ही मुख्य कारणे आहेत. 

रिमोट पायलट प्रशिक्षण आवश्यकता सीएआर कलम  3, मालिका दहा ,  भाग - I मध्ये नमूद केली आहे. त्या आधारे, प्रशिक्षण कार्यक्रम प्रत्येक एफटीओद्वारे तयार केला जातो आणि डीजीसीएच्या मान्यतेनंतर  प्रशिक्षण दिले जाते.

17 सप्टेंबर 2020 रोजी, डीजीसीएने भारतीय गुणवत्ता परिषदेने (क्यूसीआय) सादर केलेल्या "आरपीएएससाठी प्रमाणीकरण योजना " साठी तत्वतः मान्यता दिली. यामुळे त्रयस्थ  पक्षाकडून चाचणी आणि ड्रोनचे प्रमाणीकरण होईल.  क्यूसीआय आता ठरविलेल्या निकषांच्या आधारे प्रमाणीकरण संस्था  तयार करेल आणि ड्रोनसाठी चाचणी व प्रमाणीकरण प्रक्रिया सुरू करेल.

नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री (स्वतंत्र कार्यभार) हरदीपसिंग पुरी यांनी आज लोकसभेत लेखी उत्तरात ही माहिती दिली.


* * *

B.Gokhale/S.Kane/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com(Release ID: 1657952) Visitor Counter : 119


Read this release in: English , Urdu , Bengali , Punjabi