कृषी मंत्रालय
संत्र्यांची लागवड
Posted On:
21 SEP 2020 3:46PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 21 सप्टेंबर 2020
2019-20 च्या तिसऱ्या अग्रिम अंदाजानुसार, देशात संत्रा ( मंडारीन संत्रे/किनू) लागवडीखाली एकूण 4.79 लाख हेक्टर जमीन आहे. मध्य प्रदेश, पंजाब, महाराष्ट्र, राजस्थान आणि हरियाणा ही संत्रा उत्पादन घेणारी मुख्य राज्ये आहेत.
देशात संत्रा उत्पादनात घटता कल नसल्याचे खाली दिलेल्या तक्त्यावरून स्पष्ट होत आहे-
|
( in Lakh Tonne)
|
|
2017-18
|
2018-19
|
2019-20 (3rd Advance Estimate)
|
All India Production
|
51.01
|
62.43
|
63.97
|
एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान या केंद्र पुरस्कृत योजनेची 2014-15 पासून अंमलबजावणी करण्यात येत आहे.फळे, भाजीपाला, कंद, मशरूम, मसाल्याच्या वनस्पती, फुले,नारळ, काजू आणि कोको यांच्यासह फलोत्पादन क्षेत्राच्या समग्र विकासासाठी ही योजना राबवली जाते. या योजने अंतर्गत सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांचा समावेश आहे.
भारतीय कृषी संशोधन परिषद-केंद्रीय लिंबू वर्गीय संशोधन संस्था, नागपूरने आतापर्यंत देशभरातल्या 42,634 लिंबू वर्गीय फळे उत्पादकांना तर 2449 अधिकाऱ्याना,तंत्रज्ञान विषयी विविध विस्तार/ बदल यावर आधारित प्रशिक्षण दिले आहे.गेल्या पाच वर्षात, ईशान्य आणि हिमालयीन क्षेत्रासाठी, तंत्रज्ञान अभियान ( एमएम-1 ) अंतर्गत केंद्र सरकारने एकूण 20 प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित केले. यामध्ये ईशान्येकडच्या आठ राज्यांचा समावेश होता. संबंधित राज्य सरकारी अधिकारी आणि फिल्ड कर्मचाऱ्यासाठी’ रोगमुक्त वृक्षारोपण साहित्य उत्पादन’ आणि ‘लिंबूवर्गीय फळे पुनरुज्जीवन’ यासंदर्भात प्रशिक्षण देण्यात आले.
भारतीय कृषी संशोधन परिषद- केंद्रीय लिंबू वर्गीय संशोधन संस्था , नागपूरने 2003 पासून लिंबू वर्गीय फळांचे 7 लाख रोपण साहित्य उत्पादन केले असून याच्या 3000 उत्पादकांना आणि या फळांचे उत्पादन घेणाऱ्या 16 राज्यांना त्याचे वितरण करण्यात आले अशी माहिती दिली आहे. केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी काल लोकसभेत एका लेखी उत्तरात ही माहिती दिली.
M.Chopade/N.Chitale/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1657256)
Visitor Counter : 159