कंपनी व्यवहार मंत्रालय
राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायाधिकरणाची कामगिरी
प्रविष्टि तिथि:
19 SEP 2020 10:50PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 19 सप्टेंबर 2020
31 जुलै 2020 पर्यंत राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायाधिकरणाकडे(एनसीएलटी) दिवाळखोरी संहिता अंतर्गत असलेल्या 12,348 प्रकरणांसहित एकूण 19,844 प्रकरणे प्रलंबित होती. केंद्रीय अर्थसाहाय्य आणि कॉर्पोरेट व्यवहारमंत्री अनुराग ठाकूर यांनी आज लोकसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात ही माहिती दिली.
या न्यायाधिकरणामध्ये अधिकारी/ कर्मचारी यांची 320 पदे निर्माण करण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली. या पदांसाठी 21-1-2020 रोजी भरती नियम अधिसूचित करण्यात आले आणि एनसीएलटीने या पदांवर नियमित कर्मचारी भरतीसाठी पावले उचलली आहेत. सध्या नियमित तत्वावर 40 पदे भरण्यात आली आहेत.
एनसीएलटीच्या सर्व 16 पीठांमध्ये ई-कोर्ट प्रकल्पाचा अवलंब करण्यात येत आहे, असे ठाकूर यांनी सांगितले. कोविड-19 महामारीच्या काळात सर्व पीठांमध्ये व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून सुनावणी केली जात आहे.
* * *
B.Gokhale/S.Patil/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1656831)
आगंतुक पटल : 167