संरक्षण मंत्रालय
सियाचेन येथे तैनात असलेल्या सैनिकांना मिळणारे उष्मांक(कॅलरी)
प्रविष्टि तिथि:
19 SEP 2020 7:02PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 19 सप्टेंबर 2020
सियाचेन येथे तैनात असलेल्या सैनिकांच्या उर्जेची गरज भागवण्यासाठी दिलेल्या एक दिवसाच्या शिध्यामध्ये पुरेसे उष्मांक (कॅलरी) असतात.
विविध प्रकारच्या हवामानामध्ये सैनिकांच्या शरीरासाठी आवश्यक असलेल्या पोषक घटकांच्या गरजेनुसार या शिध्याचे स्वरुप आधारित असते. सियाचेनसारख्या अतिउंचीवरील प्रदेशात (12,000 फुटांच्या वर) अशा प्रकारच्या वातावरणाला तोंड देताना खर्च होणारी उर्जा मिळवण्यासाठी विशेष प्रकारचा शिधा दिला जातो. 12,000 फुटांवर तैनात असलेल्या सैनिकांची खर्च होणारी उर्जा आणि त्यांना मिळणारी उर्जा याबाबत डिफेन्स इन्स्टिट्युट ऑफ फिजियॉलॉजी अँड अलाईड सायन्सने केलेल्या अभ्यासाचा तपशील खालीलप्रमाणे आहे:-
एकूण खर्च होणारी उर्जा – 4270 किलोकॅलरी (±550)
सध्या दिल्या जाणाऱ्या शिध्यामधून मिळणारी एकूण उर्जा – 5350 किलोकॅलरी
यातून असे दिसते की या शिध्यामधून मिळणारे उष्मांक पुरेसे आहेत.
सध्या अस्तित्वात असलेल्या एका भक्कम सुस्थापित यंत्रणेद्वारे हे निश्चित केले जाते की सैनिकांसाठी अन्नाच्या गरजेनुसार दिल्या जाणाऱ्या दर्जेदार शिध्यामुळे त्यांच्या पसंतीचे अन्न पुरवण्याबरोबरच सर्व ठिकाणी त्यांच्या पोषणविषयक गरजांची पूर्तता देखील होते. सियाचेनमध्ये देखील सैनिकांना त्यांच्या पसंतीच्या अन्नाबरोबरच त्यांच्या पोषणविषयक गरजांची पूर्तता करण्यावर भर दिला जातो. संरक्षण राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी आज राज्यसभेत शांता छेत्री यांना एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात ही माहिती दिली.
* * *
B.Gokhale/S.Patil/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1656723)
आगंतुक पटल : 132