संरक्षण मंत्रालय
भारतीय हवाई दलात महिला वैमानिक
Posted On:
19 SEP 2020 6:20PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 19 सप्टेंबर 2020
भारतीय हवाई दलात महिला अधिकाऱ्यांची संख्या 1 सप्टेंबर 2020 रोजी 1875 (एक हजार आठशे पंचाहत्तर) आहे. यापैकी 10 महिला अधिकारी लढाऊ वैमानिक तर 18 महिला अधिकारी नेव्हिगेटर आहेत.
लढाऊ पायलट म्हणून महिला अधिकाऱ्यांना समाविष्ट करण्याबाबत मंत्रालयाकडे भारतीय हवाई दलाकडून प्रस्ताव आला आहे. संरक्षण मंत्रालयाच्या मंजुरीनंतर हवाई दलाने 2016,मध्ये “लढाऊ वैमानिक म्हणून महिला एसएससी अधिकाऱ्यांचा समावेश” ही योजना सुरु केली . या योजनेअंतर्गत आतापर्यंत 10 (दहा) महिला लढाऊ पायलट कार्यरत आहेत.
निहित धोरणानुसार सामरिक गरजा आणि परिचालन आवश्यकतेनुसार महिला लढाऊ वैमानिक हवाई दलात समाविष्ट आणि तैनात केले जातात, ज्याचा वेळोवेळी आढावा घेतला जातो.
संरक्षण राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी आज राज्यसभेत डॉ विकास महात्मे यांना लेखी उत्तरात ही माहिती दिली.
* * *
B.Gokhale/S.Kane/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1656696)
अभ्यागत कक्ष : 186