शिक्षण मंत्रालय

उच्च शिक्षणात राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 च्या अंमलबजावणीवरील निमंत्रितांच्या परिषदेचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून उद्घाटन

एनईपी न्याय्य आणि सचेतन ज्ञानी समाजाच्या विकासाचा दृष्टीकोन निर्धारित करणारे- राष्ट्रपती रामनाथ कोविंद

एनईपीमध्ये भारत- केंद्रित शिक्षण प्रणालीचा दृष्टीकोन असून त्याचे भारताला जागतिक महासत्तेमध्ये रुपांतरित करण्यामध्ये योगदान असेल- शिक्षणमंत्री

Posted On: 19 SEP 2020 4:03PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 19 सप्‍टेंबर 2020

 

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आज केंद्रीय विद्यापीठांचे कुलगुरू, शिक्षण मंत्रालय आणि इतर मंत्रालयांच्या राष्ट्रीय महत्त्वाच्या संस्थांचे संचालक या निमंत्रितांच्या परिषदेचे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून उद्घाटन केले. समावेश आणि प्रावीण्य या दुहेरी उद्दिष्टांना साध्य करून 21 व्या शतकाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी शिक्षण प्रणालीचे पुनरुज्जीवन करण्याचा नवीन शैक्षणिक धोरणाचा उद्देश आहे. सर्वांना दर्जेदार शिक्षण उपलब्ध करून न्याय्य आणि सचेतन ज्ञानी समाज विकसित करण्याचा नव्या शैक्षणिक धोरणाचा दृष्टिकोन असल्याचे प्रतिपादन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी या परिषदेच्या उद्घाटन समारंभात बोलताना केले.  

 


राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्‍या संपूर्ण भाषणासाठी येथे क्लिक करा 

केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी या परिषदेत उद्घाटनपर भाषण केले. शिक्षण हा कोणत्याही समाजाच्या प्रगतीचा पाया आहे, असे त्यांनी या परिषदेला उपस्थित असलेल्या मान्यवरांचे स्वागत करताना सांगितले. एका भक्कम शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करणे हे सरकारची केवळ घटनात्मक नव्हे तर नैतिक जबाबदारी आहे, असे त्यांनी सांगितले. आपल्या शिक्षण प्रणालीचे विकेंद्रीकरण करण्यास आणि तिला बळकट करण्यास नव्या शैक्षणिक धोरणाची मदत होईल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

7 सप्टेंबर 2020 रोजी याच विषयावर राष्ट्रपतींच्या मार्गदर्शनाखाली राज्यपालांच्या परिषदेचे आयोजन करण्यात आले होते, याची आठवण पोखरियाल यांनी करून दिली. या धोरणाच्या अंमलबजावणीचे नियोजन करण्याच्या उद्दिष्टाची सुरुवात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली होती आणि आपल्या देशातील शिक्षणाचा दर्जा सुधारण्यावर भर देण्यात आला आहे. या धोरणाने भारतात परदेशी विद्यापीठांना दारे खुली केली आहेत आणि त्याच प्रकारे भारतातील विद्यापीठांना परदेशात संस्था सुरू करण्याची अनुमती दिली आहे ज्यामुळे  भारताला सॉफ्ट पॉवर बनवण्याच्या प्रक्रियेत हे धोरण महत्त्वाची भूमिका बजावेल, असे शिक्षणमंत्र्यांनी सांगितले. एनईपीवर भर देताना शिक्षणमंत्र्यांनी या धोरणाच्या अंमलबजावणीमधील अडथळे दूर केले पाहिजेत आणि संबंधितांसोबत संवादाची प्रक्रिया सुरू झाली पाहिजे, अशी  अपेक्षा व्यक्त केली. हे धोरण जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याची विनंती त्यांनी कुलगुरू आणि संस्थांच्या प्रमुखांना केली. या धोरणाच्या अंमलबजावणीच्या प्रक्रियेबाबत जागरुकता निर्माण करण्यासाठी समाजातील सर्व स्तरांचे पाठबळ आवश्यक असल्याकडे त्यांनी लक्ष वेधलं. सर्व संस्था, शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यातील ताळमेळ या धोरणाची जलदगतीने अंमलबजावणी करण्यासाठी उपयुक्त ठरेल, असे पोखरियाल यांनी सांगितले.

 

 

केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल यांच्‍या संपूर्ण भाषणासाठी येथे क्लिक करा

उद्घाटनाच्या सत्रानंतर बहुशाखा आणि समग्र शिक्षण, उच्च शिक्षणात संशोधन आणि नवोन्मेष, उच्च शिक्षणात डिजिटल परिवर्तन, आंतरराष्ट्रीयीकरण आणि जागतिक मानांकन, समानता, व्याप्ती आणि प्रावीण्य यासाठी समावेश आणि क्षमता उभारणी यांसारख्या विविध सत्रांचे आयोजन करण्यात आले. केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक यांच्यासोबत, शिक्षण राज्यमंत्री संजय धोत्रे, उच्च शिक्षण सचिव अमित खरे, एनईपीच्या मसुदा समितीचे अध्यक्ष डॉ. के कस्तुरीरंगन आणि मंत्रालयाचे इतर वरिष्ठ अधिकारी, यूजीसी आणि एआयसीटीईचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.

 

* * *

B.Gokhale/S.Patil/D.Rane
 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1656654) Visitor Counter : 114