नागरी उड्डाण मंत्रालय
भारतातल्या सर्व शेड्युल्ड विमान कंपन्यांसाठी डीजीसीए कडून विशेष सुरक्षा ऑडीट
या कंपन्यांसाठी नियामक ऑडीट दर दोन वर्षांनी
प्रविष्टि तिथि:
17 SEP 2020 9:45PM by PIB Mumbai
देशातल्या सर्व शेड्युल्ड विमान कंपन्यांसाठी डीजीसीए विशेष सुरक्षा ऑडीट करत आहे. विमानतळासाठी 13 परवानाधारक विमानतळांची, डीजीसीएने पावसाळ्यात स्पॉट तपासणी केली.
नियामक ऑडीटच्या नियमाप्रमाणे शेड्युल्ड विमान कंपन्यांचे नियामक ऑडीट दर दोन वर्षांनी केले जाते. मात्र सर्वेक्षणादरम्यान काढलेले निष्कर्ष, स्पॉट तपासणी, तक्रारी, स्वेच्छा अहवाल,जोखीम आधारित ऑडीट, घटनांची तीव्रता यावरून विशेष ऑडीटच्या रूपाने, जोखीम आधारित ऑडीट करण्यात येत आहे.
आधीच्या सुरक्षा ऑडीट दरम्यान डीजीसीएला काही त्रुटी आढळल्या होत्या. त्या दूर करण्याच्या दृष्टीकोनातून विमान कंपनी संचालकांना कळवण्यात आल्या. यामध्ये यांचा समावेश होता-
- विमान कंपन्यांकडून एखादी घटना किंवा दुर्घटना याबाबत न कळवणे
- विमान कंपन्यांच्या देखभाल नियंत्रण केंद्रात तांत्रिक दृष्ट्या योग्य पुरेसे कर्मचारी नसणे.
-निर्मात्याने शिफारस केलेल्या पद्धतीनुसार काही पद्धती उपयोगात नसणे
-कामाच्या ठिकाणा संदर्भातल्या नियमावलीचे, दस्तावेज विषयक प्रक्रियेचे पालन न करणे
प्रत्येक संस्थेने कृती अहवाल सादर केला आहे. प्रभावी अनुपालनासाठी त्याची समीक्षा करण्यात येत आहे.ज्या क्षेत्रात सुधारणा अपेक्षित होत्या त्या क्षेत्रात, नुकत्याच केलेल्या निरीक्षण आणि ऑडीटमध्ये सुधारणा दिसून आली आहे.
हवाई वाहतूक राज्य मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी आज लोकसभेत लेखी उत्तरात ही माहिती दिली.
B.Gokhale/N.Chitale/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1655885)
आगंतुक पटल : 97