अल्पसंख्यांक मंत्रालय
प्रधानमंत्री जन विकास कार्यक्रम देशातील 1300 निवडक अल्पसंख्याक बहुल क्षेत्रात राबवला जात आहे: मुख्तार अब्बास नकवी
Posted On:
17 SEP 2020 9:23PM by PIB Mumbai
अल्पसंख्यक व्यवहार मंत्रालयामार्फत राबवल्या जाणार्या अनेक योजनांपैकी प्रधानमंत्री जन विकास कार्यक्रम (पीएमजेव्हीके) ही एकमेव केंद्र पुरस्कृत योजना आहे, त्याअंतर्गत राज्य सरकारांना निधी जारी केला जातो.
2018 मध्ये प्रधानमंत्री जन विकास कार्यक्रमाची (पीएमजेव्हीके) पुनर्र्चना करण्यात आली. आणि आता 1300 निवडक अल्पसंख्याक बहुल भागात याची अंमलबजावणी केली जात आहे, ज्याचा उद्देश या भागात सामाजिक-आर्थिक पायाभूत सुविधा आणि मूलभूत सुविधांचा विकास करणे हा आहे. ही योजना मोठ्या प्रमाणात राबवण्यासाठी पीएमजेव्हीके अंतर्गत क्षेत्र 90 जिल्ह्यांवरून 308 जिल्ह्यांपर्यंत वाढवण्यात आले असून त्यामध्ये 870 तालुके, 321 शहरे आणि 109 जिल्हा मुख्यालयांचा समावेश आहे.
2014-15 ते 2019-20 पर्यंत राजस्थानातील अल्पसंख्याक बहुल भागातल्या प्रकल्पांसाठी पीएमजेव्हीके योजनेंतर्गत 291.14 कोटी रुपये वितरित करण्यात आले असून त्यापैकी राजस्थान राज्यात अलवर जिल्ह्यातील अल्पसंख्याक बहुल भागासाठी रुपये 88.57 कोटींचे वाटप करण्यात आले आहे.
केंद्रीय अल्पसंख्याक कार्यमंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी आज लोकसभेत लेखी उत्तरात ही माहिती दिली.

B.Gokhale/S.Kane/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1655865)
Visitor Counter : 145