नागरी उड्डाण मंत्रालय

कोविड-19 काळात हवाई वाहतूक क्षेत्राला उभारी देण्यासाठी उपाययोजना

Posted On: 17 SEP 2020 8:06PM by PIB Mumbai

 

कोविड महामारीचा हवाई वाहतूक क्षेत्रावरचा प्रतिकूल परिणाम कमी राहावा यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येत आहेत. या क्षेत्राला सहाय्य करण्यासाठी करण्यात येत असलेल्या उपाययोजनांपैकी काही याप्रमाणे-

- देशांतर्गत हवाई सेवा श्रेणीबद्ध रीतीने पुन्हा सुरु करण्यात आली आहे. सुरवातीला उन्हाळी वेळापत्रकाच्या  केवळ एक तृतीयांश सेवेसाठी परवानगी देण्यात आली,त्यानंतर 26 जून 2020 ला  त्यात 45 %पर्यंत वाढ करण्यात आली तर 2 सप्टेंबर 2020 ला 60 % पर्यंत वाढ करण्यात आली.

- प्रादेशिक कनेक्टीव्हिटी योजना उडान अंतर्गत उड्डाणाना वरील निर्बंधाविना उड्डाणासाठी परवानगी आहे.

विशिष्ट देशांसमवेत एअर लिंक किंवा एअर बबल निर्माण करण्यात आले असून यात अफगाणिस्तान, बहारीन, कॅनडा, फ्रांस, जर्मनी, कतार, मालदीव, संयुक्त अरब अमिरात, ब्रिटन आणि अमेरिका यांचा समावेश आहे. आंतरराष्ट्रीय प्रवासी सेवा पुन्हा सुरु करण्याच्या उद्देशाने केलेली ही तात्पुरती व्यवस्था आहे, कोविड-19 मुळे नियमित आंतरराष्ट्रीय उड्डाणे स्थगित आहेत.

- सार्वजनिक-खाजगी भागीदारीच्या माध्यमातून सध्याच्या आणि नव्या विमानतळासाठी खाजगी गुंतवणुकीला चालना

सर्व महत्वाच्या विमानतळावर आवश्यक असेल तेव्हा मालविषयक टर्मिनल कार्यान्वित राहील याची खातरजमा करण्यासाठी पुरेशी काळजी घेण्यात येत आहे.

देशांतर्गत देखभाल, दुरुस्ती सेवेसाठी वस्तू आणि सेवा कर दरात 5 % पर्यंत कपात

आंतरराष्ट्रीय हवाई मालवाहतुकीत भारतीय वाटा वाढण्यासाठी प्रोत्साहन

प्रभावी हवाई क्षेत्र व्यवस्थापन,छोटे मार्ग आणि इंधन ज्वलनात  कपात करण्यासाठी भारतीय हवाई दलासमवेत भारतीय हवाई क्षेत्र मार्गाचे सुसूत्रीकरण  

हवाई वाहतूक राज्य मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी आज लोकसभेत लेखी उत्तरात ही माहिती दिली.

 

B.Gokhale/N.Chitale/P.Kor

***

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1655832) Visitor Counter : 136