नागरी उड्डाण मंत्रालय

भारताचे 10 देशांबरोबर एअर  बबल करार आहेत

Posted On: 17 SEP 2020 7:28PM by PIB Mumbai

 

भारताने  13.09.2020 पर्यंत अमेरिका, कॅनडा, फ्रान्स, जर्मनी, ब्रिटन , मालदीव, युएई, कतार, अफगाणिस्तान आणि बहारीन या 10 देशांबरोबर  एअर बबल करार केले आहेत.

 

एअर बबल्स कराराची आवश्यक माहिती खालीलप्रमाणे आहे.

1.  कोविड 19 महामारीमुळे  नियमित आंतरराष्ट्रीय उड्डाणे बंद करण्यात आल्यामुळे व्यावसायिक प्रवासी सेवा पुन्हा सुरू करण्याच्या उद्देशाने हे दोन देशांमधील तात्पुरते करार आहेत.

2. ते दोन्ही देशांना हितकारक आहेत म्हणजे दोन्ही देशांतील विमान कंपन्यांना समान लाभ मिळतात.

3. विमानांच्या तिकिटांची विक्री विमान कंपनीचे संकेतस्थळ, ट्रॅव्हल एजंट्स आणि ग्लोबल डिस्ट्रिब्युशन सिस्टमद्वारे केली जाते.

सध्या सुरू असलेल्या कोविड -19 महमारीच्या पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय उड्डाणांना भारतातून / भारतात येण्यावर निर्बंध आहेत. वंदे भारत मिशन आणि एअर बबल परिचालन कार्यक्षमतेने हाताळण्यासाठी नागरी उड्डाण मंत्रालय आणि आरोग्य मंत्रालय सध्या प्रयत्नशील आहेत. नियमित व्यावसायिक आंतरराष्ट्रीय विमानसेवेला परवानगी देण्यापूर्वी राज्य सरकारांकडून पुरविल्या जाणाऱ्या मर्यादित अलगीकरण सुविधा व इतर आरोग्यविषयक सुविधा विचारात घेतल्या पाहिजेत.

आज लोकसभेत नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री (स्वतंत्र कार्यभार) हरदीपसिंग पुरी यांनी लेखी उत्तरात ही माहिती दिली.

***

B.Gokhale/S.Kane/P.Kor

***

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1655799) Visitor Counter : 125