महिला आणि बालविकास मंत्रालय

देशभरातील अंगणवाड्यांवर कोविड – 19 साथीचा प्रभाव

Posted On: 17 SEP 2020 6:23PM by PIB Mumbai

 

कोवीड -19 चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्रीय गृह मंत्रालयातर्फे जारी निर्देशानुसार आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 अंतर्गत देशभरातील अंगणवाडी केंद्रे बंद ठेवण्यात आली होती. कोवीड -19 संसर्गाच्या वाढत्या प्रकरणांच्या पार्श्वभूमीवर जुलै 2020 मध्ये राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांशी केलेल्या चर्चेदरम्यान बहुतेक राज्यांनी अंगणवाडी केंद्रे पुन्हा सुरू करण्यास असमर्थता व्यक्त केली. मात्र अंगणवाडीच्या लाभार्थींना पोषण आहार पुरवठा नियमित प्रदान व्हावा, याची खातरजमा करण्यासाठी अंगणवाडी सेविका आणि मदतनीस, या लाभार्थींना पोषण आहार घरपोच देत आहेत. त्याच बरोबर अंगणवाडी सेविकांनी या लाभार्थींना पंधरा दिवसातून एकदा अन्न आणि पोषण आहार घरपोच द्यावा, यासाठी मंत्रालयाने राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना आवश्यक निर्देश जारी केले आहेत. या व्यतिरिक्त, अंगणवाडी सेविका आणि अंगणवाडी मदतनीस, समुदायाच्या देखरेखीसाठी, जनजागृतीसाठी किंवा त्यांना वेळोवेळी देण्यात आलेल्या इतर कामांसाठी स्थानिक प्रशासनाला मदत करत आहेत.

केंद्रीय महिला आणि बालकल्याण मंत्री स्मृती झुबिन इराणी यांनी आज राज्यसभेत एका लेखी उत्तरात ही माहिती दिली.

****

B.Gokhale/M.Pange/P.Kor

***

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1655726) Visitor Counter : 142