कार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि निवृत्ती वेतन मंत्रालय

राष्ट्रीय भरती संस्था

Posted On: 16 SEP 2020 8:37PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 16 सप्‍टेंबर 2020

 

सरकारी नोकऱ्यांच्या शोधात असलेल्या उमेदवारांना निर्माण होणाऱ्या समस्या दूर करण्यासाठी त्या एकाच मंचावर उपलब्ध करून देण्यासाठी आणि भरती प्रक्रियेत समानता आणि समावेशकतेचे नवे मापदंड प्रस्थापित करण्यासाठी सरकारने 28-8-2020 च्या आदेशानुसार राष्ट्रीय भरती संस्था एनआरए स्थापन केली आहे. केंद्र सरकारी पदांसाठी उमेदवारांची चाचणी/छाननी करण्यासाठी सामाईक पात्रता परीक्षा आयोजित करणारी एआरए ही एक स्वायत्त संस्था आहे.  स्टाफ सिलेक्शन कमिशन( एसएससी), रेल्वे रिक्रूटमेंट बोर्ड(आरआरबी) आणि इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सोनेल सिलेक्शन(आयबीपीएस) यांच्याकडून या पदांसाठी भरती केली जाते. केंद्र सरकारी पदांसाठी भरती करणाऱ्या एसएससी, आरआरबी आणि आयबीपीएस या सध्या अस्तित्वात असलेल्या संस्था त्यांच्या गरजांनुसार विशिष्ट संस्थानिहाय परीक्षा/ चाचण्या घेणे सुरूच ठेवतील. एनआरएकडून केवळ सीईटीच्या माध्यमातून उमेदवारांची प्राथमिक चाचणी घेतली जाईल. एनआरएने आयोजित केलेल्या सीईटीमध्ये मिळालेल्या गुणांच्या आधारे उमेदवारांना विविध क्षेत्रांमध्ये प्रत्यक्ष भरतीसाठी एसएससी, आरआरबी आणि आयबीपीएस यांच्याकडून विशिष्ट संस्थानिहाय परीक्षा/ चाचण्यांसाठी प्रवेश देण्यात येईल

केंद्रीय कार्मिक, सार्वजनिक तक्रार निवारण, निवृत्तीवेतन, अणुउर्जा आणि अंतराळ आणि पंतप्रधान कार्यालयाचे राज्यमंत्री जितेंद्र सिहं यांनी आज लोकसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात ही माहिती दिली.


* * *

B.Gokhale/S.Patil/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1655300) Visitor Counter : 86