कार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि निवृत्ती वेतन मंत्रालय

सार्वजनिक तक्रारींचा निपटारा करण्याच्या वेळेत गेल्या सहा वर्षात सुधारणा : डॉ जितेंद्र सिंह

Posted On: 16 SEP 2020 7:15PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 16 सप्‍टेंबर 2020

 
केंद्रीय ईशान्य  प्रदेश विकास राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार), पंतप्रधान कार्यालय, कार्मिक, सार्वजनिक तक्रारी, निवृत्तीवेतन, अणु उर्जा आणि अंतराळ राज्यमंत्री  डॉ जितेंद्र सिंह यांनी आज लोकसभेत लेखी उत्तरात सांगितले की, गेल्या सहा वर्षांत तक्रारीच्या सरासरी निपटारा वेळेत हळूहळू सुधारणा झाली आहे. उदाहरणार्थ, कोविड महामारी  दरम्यान, विशेष तक्रार निवारण पर्यायाने 1.4 दिवसाच्या सरासरी निपटारा वेळेप्रमाणे प्रत्येक तक्रारीचे निवारण सुनिश्चित केले.
ते म्हणाले, मंत्रिमंडळ सचिवालयात सार्वजनिक तक्रार संचालनालय [डीपीजी] मध्ये सार्वजनिक तक्रारदाराचे प्रतिनिधीत्व घेण्याची एक यंत्रणा आहे जी सांगते  की संबंधित मंत्रालय / विभागाकडून निर्धारित कालावधीत मिळालेल्या प्रतिसादाबाबत  आपण समाधानी नाही.

मागील तीन वर्षात प्राप्त झालेल्या तक्रारींचा प्रत्यक्षात निपटारा आणि निवारणासाठी प्रलंबित असलेली संख्या पुढीप्रमाणे  - 

वर्ष

प्राप्त

प्रत्यक्ष निपटारा

प्रलंबित

2017

18,66,124

17,73,020

7,55,952

2018

15,86,415

14,98,519

8,43,848

2019

18,67,758

16,39,120

10,72,486

 

* * *

S.Thakur/S.Kane/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1655259) Visitor Counter : 80