गृह मंत्रालय

पाकिस्तान आणि चीनमधून घुसखोरीचे प्रयत्न

Posted On: 16 SEP 2020 4:50PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 16 सप्‍टेंबर 2020

 

भारत-पाकिस्तान सीमेवर गेल्या सहा महिन्यांत घुसखोरीच्या प्रयत्नांच्या घटनांची संख्या खालीलप्रमाणे आहेः

अनु. क्र. 

महिना

भारत-पाकिस्तान सीमा

1.

फेब्रुवारी, 20

-

2.

मार्च, 20

04

3.

एप्रिल, 20

24

4.

मे, 20

8

5.

जून, 20

-

6.

जुलै, 20

11


गेल्या सहा महिन्यांत भारत-चीन सीमेवर घुसखोरीची कुठलीही नोंद झालेली नाही.

सीमेपलिकडून होणारी घुसखोरी रोखण्यासाठी सरकारने बहुआयामी दृष्टीकोन स्वीकारला आहे, ज्यामध्ये आंतरराष्ट्रीय सीमा / नियंत्रण रेषेलगत बहुस्तरीय तैनाती, सुधारित गुप्तहेर यंत्रणा आणि परिचालन समन्वय, सीमेवर कुंपण, तंत्रज्ञान उपाय तैनात करणे आणि घुसखोरांविरोधात सक्रिय कारवाई करणे यांचा समावेश आहे.

गृह राज्यमंत्री नित्यानंद राय यांनी आज राज्यसभेत लेखी उत्तरात ही माहिती दिली.

 

* * *

S.Thakur/S.Kane/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1655088) Visitor Counter : 66