शिक्षण मंत्रालय
केंद्रीय शिक्षण मंत्र्यांकडून एआयसीटीई मान्यताप्राप्त संस्थांमधील 12 शिक्षकांचा पहिल्यांदाच एआयसीटीई- विश्वेश्वरय्या सर्वोत्तम शिक्षक 2020 पुरस्काराने सन्मान
असामान्य शिक्षक आणि त्यांची गुणवत्ता, सर्वोत्तम पद्धती आणि नवोन्मेषी वृत्तीचा सन्मान करण्यासाठी या पुरस्कारांची सुरुवात- रमेश पोखरियाल निशंक
Posted On:
15 SEP 2020 11:38PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 15 सप्टेंबर 2020
अभियंता दिनाच्या निमित्ताने आज केंद्रीय शिक्षण मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेच्या( एआयसीटीई) मान्यताप्राप्त संस्थांच्या 12 शिक्षकांचा पहिले एआयसीटीई- विश्वेश्वरय्या सर्वोत्तम शिक्षक पुरस्कार देऊन सन्मान केला. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. शिक्षणमंत्र्यांनी या सर्व शिक्षकांशी ऑनलाईन संवाद साधून त्यांचा सन्मान केला. एआयसीटीईचे अध्यक्ष प्रोफेसर अनिल सहस्रबुद्धे, उपाध्यक्ष प्रोफेसर एमपी पुनिया आणि एआयसीटीईचे सदस्य सचिव प्रोफेसर राजीव कुमार यावेळी उपस्थित होते आणि त्यांनी देखील पुरस्कार विजेत्यांचे अभिनंदन केले आणि राष्ट्रउभारणीमध्ये शिक्षकांच्या योगदानाचे महत्त्व अधोरेखित केले. सर मोक्षगुंडंम विश्वेश्वरय्या भारतातील अभियांत्रिकीचे जनक होते, भारतातील ते सर्वात कुशल अभियंता आणि मुत्सद्दी होते आणि त्यांनी देशाला प्रगतीपथावर नेण्यासाठी दिलेले योगदान कधीही विसरता येणार नाही, असे केंद्रीय शिक्षणमंत्र्यांनी यावेळी बोलताना सांगितले. राष्ट्रउभारणीसाठी दिलेल्या असामान्य योगदानाचा गौरव करण्यासाठी त्यांना 1955 साली भारतरत्न या सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते, असे निशंक म्हणाले. विश्वेश्वरय्यांसारख्या महान व्यक्तींनी घालून दिलेल्या आदर्शांवर वाटचाल करण्यासाठी शिक्षण मंत्रालयाने राष्ट्रीय शिक्षण धोरणाची निर्मिती केली आहे ज्यामुळे उच्च शिक्षणामध्ये समग्र आणि बहुआयामी शिक्षणाला प्रोत्साहन मिळेल, असे त्यांनी सांगितले. मात्र, उच्च शैक्षणिक संस्थांमध्ये यशाची सर्वात महत्त्वाची गुरुकिल्ली म्हणजे त्या संस्थांचा दर्जा आणि तेथील शिक्षकांचा सक्रिय सहभाग आहे, असे त्यांनी नमूद केले. उच्च शिक्षणाचे उद्दिष्ट साध्य करण्यामध्ये शिक्षकांची भूमिका अतिशय महत्त्वाची असल्याचे लक्षात घेऊन गेल्या काही वर्षात त्यांची नियुक्ती आणि त्यांच्या कारकिर्दीला चालना देण्यासाठी आणि विविध स्तरातील शिक्षकांना विविध संस्थांमध्ये योग्य प्रकारची नियुक्ती मिळवून देण्यासाठी अनेक उपक्रम हाती घेण्यात आले आहेत, अशी माहिती त्यांनी दिली.
एआयसीटीई विश्वेश्वरय्या सर्वोत्तम शिक्षक पुरस्कार 2020 चे महत्त्व अधोरेखित करताना ते म्हणाले की उच्च तंत्रशिक्षण क्षेत्रातील राष्ट्रीय स्तरावरील पदवी आणि पदविका संस्थांमधील असामान्य शिक्षक आणि त्यांची गुणवत्ता, सर्वोत्तम अध्यापन पद्धती आणि त्यांची नवोन्मेषी वृत्ती यांचा सन्मान करण्यासाठी पहिल्यांदाच हे पुरस्कार देण्यात येत आहेत. दरवर्षी अभियंता दिनी गुणवत्ताप्राप्त शिक्षकांच्या गुणवत्तेचा सन्मान करण्यासाठी आणि जागतिक पातळीवर सातत्याने बदलणाऱ्या गरजांनुसार आपली गुणवत्ता आणखी उंचावण्यामध्ये त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि त्या माध्यमातून समाजाप्रति प्रभावी योगदान देण्यासाठी हे पुरस्कार सुरू करण्यात आले आहेत, असे ते म्हणाले. देशातील एकंदर उच्च शिक्षण क्षेत्रात सुधारणा करण्यासाठी एआयसीटीईने हाती घेतलेल्या विविध दर्जेदार उपक्रमांनुसार या योजनेअंतर्गत सर्वोत्तम गुणवत्तेचा विचार करण्यात येतो, अशी माहिती त्यांनी दिली. यासाठी एआयसीटीईची मान्यता असलेल्या सर्व संस्थांकडून प्रस्ताव मागवण्यात आले होते. संशोधनावर भर, सातत्याने दिले जाणारे अभिप्राय, विद्यार्थ्यांच्या विकासाबाबतचे योगदान आणि सामाजिक समस्यांचे निराकरण यांसारख्या निकषांच्या आधारे त्यांचे मूल्यमापन करण्यात आले, असे निशंक यांनी सांगितले. या उपक्रमाला अतिशय उत्तम प्रतिसाद मिळाला आणि गुरुग्रामच्या नॉर्थ कॅप विद्यापीठाचे मुख्य मार्गदर्शक प्रोफेसर ऑफ एमिनन्स, प्र- कुलगुरू प्रोफेसर प्रेमव्रत यांच्या अध्यक्षतेखालील सात सदस्यांच्या एका समितीने निवडीसाठी आलेल्या प्रस्तावांपैकी छाननी करून निवडलेल्या 261 प्रस्तावांमधून 12 जणांची या पुरस्कारासाठी निवड केली. या कार्यक्रमात रमेश पोखरियाल निशंक यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वंकष विकासासाठी एक निरोगी सह- शैक्षणिक उपक्रमाला चालना देणाऱ्या स्पाईसेस( विद्यार्थ्यांमध्ये स्वारस्य, नवनिर्मिती आणि नीतीमत्ता या गुणांना प्रोत्साहन देणाऱ्या) या उपक्रमाची देखील सुरुवात केली.
एआयसीटीई – विश्वेश्वरय्या सर्वोत्तम शिक्षक पुरस्कार 2020
पुरस्कार विजेत्यांची यादी
अनुक्रमांक
|
नाव
|
राज्य
|
संस्था
|
प्रकार
|
1
|
डॉ. प्रशांत पवार
|
महाराष्ट्र
|
एसव्हीईआरआय कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर
|
सिविल इंजिनिअरिंग
|
2
|
डॉ. मालती आर
|
तमिळनाडू
|
सोना कॉलेज ऑफ टेक्नॉलॉजी
|
सिविल इंजिनिअरिंग
|
3
|
डॉ. मोहम्मद यार
|
नवी दिल्ली
|
स्कूल ऑफ फार्मास्युटिकल एज्युकेशन अँड रिसर्च
|
फार्मास्युटिकल केमिस्ट्री
|
4
|
डॉ. शैलजा पाटील
|
महाराष्ट्र
|
जेएसपीएम राजर्षी शाहू कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग
|
इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन
|
5
|
डॉ. जॅनेट जयाराज
|
तमिळनाडू
|
श्रीकृष्ण कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी
|
कंप्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग
|
6
|
डॉ. मनेश कोकरे
|
महाराष्ट्र
|
श्री. गुरु गोविंद सिंगजी इन्स्टिट्युट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी
|
इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग
|
7
|
डॉ. तेजल गांधी
|
गुजरात
|
आणंद फार्मसी कॉलेज
|
फार्मसी
|
8
|
डॉ. श्रीपाद भातलवंडे
|
महाराष्ट्र
|
विश्वकर्मा इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी
|
इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग
|
9
|
डॉ.फारुख अहमद काझीi
|
महाराष्ट्र
|
वीरमाता जिजाबाई टेक्नॉलॉजीकल इन्स्टिट्युट
|
इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग
|
10
|
डॉ. मनिषा शर्मा
|
छत्तीसगड
|
भिलाई इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी
|
इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन
|
11
|
डॉ. जयवदन पटेलl
|
गुजरात
|
नूतन फार्मसी कॉलेज
|
फार्मास्युटिकल
|
12
|
डॉ. नंदकुमार मादा
|
तमिळनाडू
|
आरासान गणेशन पॉलिटेक्निक कॉलेज
|
प्रिंटिंग टेक्नॉलॉजी
|
* * *
B.Gokhale/S.Patil/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1654867)
Visitor Counter : 334