गृह मंत्रालय

बिहारमध्ये 541 कोटी रुपये खर्चाच्या सात शहरी पायाभूत सुविधा प्रकल्पांचे उद्घाटन; पायाभरणीबद्दल गृहमंत्री अमित शाह यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी बद्दल व्यक्त केली कृतज्ञतेची भावना


“ 2014पासून मोदी सरकार बिहारमधील जनतेच्या कल्याणासाठी आणि या राज्याच्या विकासासाठी समर्पित वृत्तीने काम करत आहे”

“ मोदी सरकारचे हे विकास प्रकल्प बिहारमधील नागरिकांना पिण्याचे स्वच्छ पाणी उपलब्ध करून देतील आणि मलनिःसारणाच्या चांगल्या सुविधा देतील, ज्यामुळे या राज्याच्या मूलभूत पायाभूत सुविधांमध्ये महत्त्वाच्या सुधारणा होतील”

“ मुझफ्फरपूर नदी क्षेत्र विकासामुळे पर्यटन क्षेत्र आणि पर्यावरणाला खूप मोठ्या प्रमाणात चालना आणि बळकटी देतील, त्यामुळे लोकांना अनेक प्रकारच्या रोजगारसंधी उपलब्ध होतील”

Posted On: 15 SEP 2020 4:54PM by PIB Mumbai

नवी दिल्ली,  15 सप्टेंबर  2020

बिहारमध्ये 541 कोटी रुपये खर्चाच्या सात शहरी पायाभूत सुविधा प्रकल्पांचे उद्‌घाटन आणि पायाभरणीबद्दल केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे कृतज्ञतेची भावना व्यक्त केली आहे. 2014पासून मोदी सरकार बिहारमधील जनतेच्या कल्याणासाठी आणि या राज्याच्या विकासासाठी समर्पित वृत्तीने काम करत आहे. बिहारमध्ये पाणीपुरवठा, मलप्रक्रिया आणि नदी क्षेत्र विकासाशी संबंधित 541 कोटी रुपयांच्या सात पायाभूत सुविधा प्रकल्पांचे उद्‌घाटन आणि पायाभरणी केल्याबद्दल मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे कृतज्ञता व्यक्त करत आहेअसे केंद्रीय गृहमंत्र्यांनी ट्वीट केले आहे.

मोदी सरकारचे हे विकास प्रकल्प बिहारमधील नागरिकांना पिण्याचे स्वच्छ पाणी उपलब्ध करून देतील आणि मलनिःसारणाच्या चांगल्या सुविधा देतील, ज्यामुळे या राज्याच्या मूलभूत पायाभूत सुविधांमध्ये महत्त्वाच्या सुधारणा होतील. मुझफ्फरपूर नदी क्षेत्र विकासामुळे पर्यटन क्षेत्र आणि पर्यावरणाला खूप मोठ्या प्रमाणात चालना आणि बळकटी देतील, त्यामुळे लोकांना अनेक प्रकारच्या रोजगारसंधी उपलब्ध होतील, असे अमित शाह यांनी म्हटले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज बिहारमध्ये सात महत्त्वाच्या पायाभूत सुविधा प्रकल्पांचे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून उद्‌घाटन आणि भूमीपूजन केले.

यापैकी चार प्रकल्प पाणीपुरवठयाशी संबंधित आहेत, दोन प्रकल्प मलनिःसारण आणि प्रक्रियेशी संबंधित आहेत आणि एक प्रकल्प नदी परिसर विकासाशी संबंधित आहे. या सर्व प्रकल्पांची अंमलबजावणी बिहारच्या शहर विकास आणि गृहनिर्माण विभागांतर्गत बिडकोकडून (BUIDCO) केली जाणार आहे. यावेळी बिहारचे मुख्यमंत्री नीतीश कुमार उपस्थित होते.

 

B.Gokhale/S.Bedekar/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1654671) Visitor Counter : 113