केंद्रीय लोकसेवा आयोग

एनडीए आणि नौदल अकादमी परीक्षा (II), 2019 चे अंतिम निकाल जाहीर

प्रविष्टि तिथि: 14 SEP 2020 10:10PM by PIB Mumbai

 

केंद्रीय लोकसेवा आयोगाने 17 नोव्हेंबर 2019 मध्ये घेतलेल्या परीक्षेत आणि त्यानंतर  संरक्षण मंत्रालयाच्या सेवा निवड मंडळाने घेतलेल्या मुलाखतीच्या आधारावर पात्र 662 उमेदवारांची यादी देण्यात आली आहे.  राष्ट्रीय संरक्षण अकादमीच्या लष्कर, नौदल आणि हवाई दल यासाठीच्या  144 व्या अभ्यासक्रमाच्या, नौदल अकादमीच्या 106 व्या  अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी या मुलाखती घेण्यात आल्या. अभ्यासक्रम सुरु होण्याच्या  तारीखेबाबत  सविस्तर माहितीसाठी संरक्षण मंत्रालयाच्या www.joinindianarmy.nic.in  आणि  www.careerindianairforce.cdac.in.  या संकेत स्थळाला भेट द्यावी.ही यादी तयार करताना वैद्यकीय परीक्षेचा निकाल लक्षात घेण्यात आलेला नाही.

उमेदवारांची उमेदवारी तात्पुरती असून, त्यांनी जन्म दाखला, शैक्षणिक पात्रता यासंदर्भात  आवश्यक  प्रमाणपत्रे,अतिरिक्त भर्ती महासंचालनालय, एकीकृत मुख्यालय, संरक्षण मंत्रालय, ( लष्कर )पश्चिम ब्लॉक III, विंग- I, आर के पुरम, नवी दिल्ली -110066 इथे   सादर करण्याच्या अधीन असेल. युपीएससी कडे ही कागदपत्रे सादर करायची नाहीत.

पत्यात बदल असल्यास उमेदवाराने तातडीने वर दिलेल्या पत्यावर  लष्कर मुख्यालयाशी संपर्क साधावा.

यूपीएससीच्या https://www.upsc.gov.in. या संकेत स्थळावरही निकाल उपलब्ध आहे.मात्र गुण अंतिम निकालाच्या 15 दिवसानंतर उपलब्ध होतील.

अधिक माहितीसाठी उमेदवार आयोगाच्या सी प्रवेश द्वाराजवळच्या सुविधा केंद्राशी प्रत्यक्ष किंवा  011-23385271/011-23381125/011-23098543 या दूरध्वनी क्रमांकावर कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी सकाळी 10:00 ते संध्याकाळी 5  या वेळेत संपर्क करू शकतात.

 

निकाल पाहण्यासाठी इथे क्लिक करा

 

M.Chopade/N.Chitale/P.Kor

***

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(रिलीज़ आईडी: 1654261) आगंतुक पटल : 159
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: Bengali , English , Urdu , Punjabi