शिक्षण मंत्रालय

दुर्बल गटांना दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी सरकारने उचललेली पावले

Posted On: 14 SEP 2020 6:39PM by PIB Mumbai

 

ऑनलाइन / डिजिटल शिक्षण सर्वांना समान पद्धतीने उपलब्ध व्हावे हे सुनिश्चित करण्यासाठी सरकार वचनबद्ध आहे. स्वयंम या देशांतर्गत विकसित एमओओसी (मॅसिव ओपन ऑनलाईन कोर्स) व्यासपिठाद्वारे दर्जात्मक ऑनलाईन अभ्यासक्रम घेतले जातात. प्रत्येकाला इंटरनेट उपलब्ध नसल्यामुळे, स्वयम-प्रभा या प्रमुख उपक्रमांतर्गत शिक्षण मंत्रालयाने शाळा आणि उच्च शैक्षणिक संस्थांसाठी शैक्षणिक सामग्रीचा समावेश असलेले  34 शैक्षणिक दूरचित्रवाणी वाहिन्या सुरु केल्या आहेत. पूर्वनिर्धारित वेळापत्रकानुसार दररोज अभ्यासक्रम-आधारित सामग्री प्रसारित केली जाते. विद्यार्थ्यांच्या सोयीनुसार ते त्यांना उपलब्ध होऊ शकते. शालेय शिक्षणासाठी एक वर्ग, एक वाहिनीची तरतूद आहे. या व्यतिरिक्त, PM eVIDYA नावाचा सर्वसमावेशक उपक्रम सुरू केला असून जे डिजिटल / ऑनलाइन / ऑन-एयर शिक्षणाशी संबंधित सर्व प्रयत्नांना समाकलित करते जेणेकरून बहु-पद्धतीचा उपयोग शिक्षणासाठी केला जाऊ शकेल. उपक्रमामध्ये समावेश आहे:-

  1. एनआयआरएफच्या पहिल्या 100 उच्च शैक्षणिक संस्था (एचईआय) किंवा  3.26 गुण असलेल्या एनएएसी  यूजीसीच्या पूर्व परवानगीशिवाय ऑनलाइन कार्यक्रम घेऊ शकतात. 3.01 ते  3.25 च्या एनएएसी गुण असणार्‍या संस्था यूजीसीच्या पूर्व मान्यतेसह ऑनलाईन कार्यक्रम घेऊ  शकतात.
  2. पारंपारिक अभ्यासक्रमांसाठी, नियमित पदवी कार्यक्रमांमध्ये ऑनलाईन सामग्री 20% वरून 40% पर्यंत वाढविण्यात आली आहे.
  3. राज्य / केंद्रशासित प्रदेशातील शालेय शिक्षणासाठी दर्जेदार ई-सामग्री प्रदान करण्यासाठी देशातील डिजिटल पायाभूत सुविधा: आणि सर्व ग्रेडसाठी क्यूआर कोडित उर्जित पाठ्यपुस्तके (एक देश, एक डिजिटल व्यासपीठ )
  4. इयत्ता 1 ते 12 साठी  12 वाहिन्यांना प्रायोगिक तत्त्वावर अभ्यास साहित्य उपलब्ध करुन दिले असून  या वाहिन्या पूर्णवेळ   चालविण्यासाठी वेगवान कार्यवाही केली जाते.
  5.  रेडिओ, कम्युनिटी रेडिओ आणि सीबीएसई पॉडकास्ट – शिक्षावाणीचा विस्तृत वापर
  6. नेत्रहीन आणि श्रवण बाधित लोकांसाठी डिजिटल सुलभ सूचना प्रणाली (डेझी) आणि एनआयओएस संकेतस्थळ / यूट्यूब वर सांकेतिक भाषेत विशेष ई-सामग्री विकसित केली आहे.

सरकारने सुरु केलेल्या उपरोक्त उपाययोजनांमुळे दुर्बल घटकांना विना अडथला दूरस्थ शिक्षण प्राप्त करण्यास मदत होईल.

केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरियाल ‘निशंक’ यांनी आज लोकसभेत लेखी उत्तरात ही माहिती दिली.

*****

M.Iyangar/S.Mhatre/P.Kor

***

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1654154) अभ्यागत कक्ष : 104