विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय

शालेय विद्यार्थ्यांना नवनिर्मितीसाठी प्रोत्साहित करण्याच्या माध्यमातून नवोपक्रम पिरॅमिडचा आधार व्यापक होत आहे


2020-21 वर्षासाठी ऑनलाईन अर्जाची प्रक्रिया 1 जूनपासून सुरु; विद्यार्थी www.inspireawards-dst.gov.in ऑनलाईन पोर्टलवर नवक्लपना दाखल करु शकतात

Posted On: 13 SEP 2020 5:20PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 13 सप्‍टेंबर 2020

 

लुईस कॅरोलच्या अ‍ॅलिसला असे पेय सापडले जे तिला आश्चर्यचकित करणाऱ्या लहान-लहान गोष्टी तयार करते ज्यामुळे तिला तिच्या वंडरलँडमध्ये कोणत्याही आकारात फिरता येते. सर्जनशील मुले त्यांच्या आसपास आणि आजूबाजूच्या समस्यांवरील अभिनव उपाय शोधू शकतात.

सरकारचे प्रयत्न या कल्पनेला चालना देतात आणि दैनंदिन समस्यांचे विज्ञान आणि तंत्रज्ञानावर आधारित निराकरण करण्याठी नावीन्यपूर्ण आधार प्रदान करतात. विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाकडून अशा कल्पना मागवल्या जातात आणि गुणवंत कल्पनांना 10,000 रुपयाचे पारितोषक देऊन जिल्हा, राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरील प्रदर्शनासाठी मार्गदर्शन केले जाते.  

‘दी मिलिअन माईण्डस ऑग्मेन्टींग नॅशनल एस्पीरेशन्स अँड नॉलेज’ (MANAK) कार्यक्रमाची सुरुवात विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाने 2017 मध्ये नॅशनल इनोव्हेशन फाऊंडेशनच्या भागीदारीने केली. तरुणांच्या कल्पनांच्या सामर्थ्यावर यात भर दिला जातो आणि या कल्पनांचा अभिनव कामासाठी आणि समस्येचे निराकरण करण्यासाठी उपयोग करण्यात येतो.   

देशातील 6 लाख शाळांमध्ये विस्तारलेल्या उज्ज्वल मनाची शक्ती वाढविण्याच्या उद्देशाने डीएसटी सरकारी आणि खासगी शाळांमधील विद्यार्थ्यांकडून सामान्य समस्या सोडविण्याची क्षमता असलेल्या मूळ आणि नाविन्यपूर्ण कल्पना मागवते.  

2019 मध्ये सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील 3.8 लाख विद्यार्थ्यांनी आपल्या कल्पना सादर केल्या होत्या, ही संख्या दरवर्षी वाढत आहे. यापैकी काहीजणांना नमुने (प्रोटोटाईप) विकसित करण्यासाठी 10,000 रुपयांची आर्थिक मदत केली. जिल्हा पातळीवरील आणि राज्य पातळीवरील प्रदर्शन आणि प्रकल्प स्पर्धांमधून यापैकी काहींची राष्ट्रीय पातळीवर निवड झाली.  

यावर्षी 2020-21 साठीचे ऑनलाईन अर्ज दाखल करण्यास 1 जून 2020 पासून सुरुवात झाली आहे. कोविड-19 परिस्थितीमुळे विद्यार्थी शाळेत जाऊ शकत नाहीत, हे लक्षात घेऊन विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाने www.inspireawards-dst.gov.in या पोर्टलवर ऑनलाईन कल्पना सादर करण्यास सांगितले आहे.  

जागतिक नवकल्पना निर्देशांकात भारत वेगाने प्रगती करत असताना, सरकारच्या प्रयत्नांनी त्वरेने आपल्या कल्पनांचा प्रयोग करण्याचे धाडस करणाऱ्या तरूणांमध्ये नवनिर्मितीच्या संस्कृतीला चालना दिली जात आहे. देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी असलेल्या स्वप्नांसह ही चळवळ देशाच्या ग्रामीण भागात वेगाने पसरली आहे.


* * *

B.Gokhale/S.Thakur/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1653786) Visitor Counter : 140