आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

पंतप्रधानांच्या प्रधान सचिवांनी घेतला कोविड-19चा समग्र (सर्वसमावेशक) आढावा


विविध मंत्रालये आणि विभागांनी केलेल्या चांगल्या कार्याची केली प्रशंसा

काळजी घेत आणि तत्परता दाखवत लक्ष केंद्रित भागात अनलाँक तसेच

लस विकसित करण्याबाबतही झाली चर्चा

Posted On: 12 SEP 2020 11:34PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 12 सप्‍टेंबर 2020

 

पंतप्रधानांचे प्रधान सचिव डॉ. पी.के.शर्मा यांनी त्यांच्या अध्यक्षतेखाली  कोविड-19च्या तयारी बाबतची तत्परता आणि प्रतिसाद याचा समग्र आढावा घेण्यासाठी आज  एक बैठक घेतली.या बैठकीचा केंद्रबिंदू विविध जिल्हे आणि राज्यांत पूर्वकार्यावर आधारीत रुग्णांचे व्यवस्थापन हा होता. या बैठकीत लस विकसित करण्याचा टप्पा आणि लस वाटपाची व्यवस्था याबाबतही चर्चा झाली. दीर्घ कालावधीसाठी कोविड व्यवस्थापन करण्याच्या विविध पैलूंसाठी  जिल्हा आरोग्य कृतीआराखडा तयार करण्याच्या आवश्यकतेबाबतही  चर्चा करण्यात आली.

या बैठकीला, मंत्रीमंडळ सचिव, नीती आयोगाचे सदस्य डॉ. विनोद पाॅल, प्रमुख वैज्ञानिक सल्लागार आणि कृतीआराखडा समितीतील संयोजन अधिकारी तसेच विविध संबंधित विभागांचे सचिव उपस्थित होते. सर्व अधिकारी समित्यांनी, कोविड व्यवस्थापनाचे मानदंड साध्य करण्यासाठी,कठोर परिश्रम घेतल्याची दखल घेऊन त्यांनी  समाधान व्यक्त केले.

पंतप्रधानांच्या प्रधान सचिवांनी सर्वसंबंधित जिल्हे आणि राज्यांना कोविड-19च्या, पूर्वज्ञानावर आधारीत विविध पैलूंच्या सर्वसमावेशक तयारीसह, सक्रीय सहभागी होण्याचे आदेश दिले. 

आरोग्य सचिवांनी कोविडची  भारतातील सद्यस्थिती त्यावरील धोरणात्मक हस्तक्षेप आणि भविष्यातील आव्हाने या संदर्भात एक सादरीकरण केले. या सादरीकरणात, विविध राज्यांतील जिल्हानिहाय पाॅझिटिव्ह  रुग्णांची स्थिती ,केलेल्या चाचण्या, मृत्यूदर, रूग्ण सकारात्मक नमुना स्थिती यावर भर देण्यात आला.आरोग्य सचिवांनी लस तयार झाल्यावर, लसीचा साखळी पुरवठा, लाभार्थी नावनोंदणी प्रणाली (व्यवस्था ) आणि वितरण  व्यवस्था याविषयाच्या ई व्हीआयएन मंचाचीही यावेळी चर्चा करण्यात केली.

नीती आयोगाच्या सदस्याने रूग्णांच्या वर्तमान स्थितीबद्दल विविध प्रारुपांवर आधारीत, तपशीलवार सादरीकरण केले.कोविड-19च्या  लस व्यवस्थापनासाठी राष्ट्रीय तज्ञांच्या समितीच्या सतत सुरू असलेल्या प्रयत्नांबद्दल ही त्यांनी  स्पष्टीकरण दिले. लसीच्या संशोधनाबद्दलच्या एकूण चित्राबाबत (देशातील आणि परदेशातील दोन्ही ठिकाणच्या-उपस्थितांना) अवगत करण्यात आले. विविध ठिकाणच्या रुग्णस्थितीबाबतच्या सद्यस्थितीनुसार गेल्या काही महिन्यांतील ज्ञान आणि विश्लेषण यावर आधारीत तपशीलवार कृती आराखडा येत्या काही महिन्यांत तयार करण्याचे आदेश संबधितांना  प्रधान सचिवांनी दिले.

पंतप्रधानांच्या प्रधान सचिवांनी सातत्याने, काळजी घेण्यावर तसेच दोन मीटरचे अंतर ठेवणे, मास्क वापरणे, सतत हात धुणे या  प्रतिबंधात्मक उपाययोजना करत रहाण्यावर भर दिला. जेष्ठांची काळजी घेण्यावर आणि कठोरपणे शारीरिक अंतर ठेवण्याचे पालन करत प्रतिबंधात्मक उपाय योजना करण्यावर  त्यांनी पुन्हा भर दिला. 

सुनियोजितपणे वर्तणूकीत बदल अभियानाची पुन्हा सुरवात करणे कसे आवश्यक आहे हे विषद केले. 

अनलाॅक, काम करणे आणि औषधविरहीत प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याची आत्यंतिक  आवश्यकता असल्याची शिफारस यावेळी करण्यात आली.


* * *

B.Gokhale/S.Patgaonkar/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1653769) Visitor Counter : 152