रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय
रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाकडून आयआरएडी (iRAD) ॲप मार्गदर्शन आणि प्रशिक्षण कार्यक्रम
Posted On:
12 SEP 2020 7:05PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 12 सप्टेंबर 2020
रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने कर्नाटक जिल्ह्यातील निवडक जिल्ह्यांसाठी 7 आणि 8 सप्टेंबर रोजी आणि उत्तर प्रदेशातील काही जिल्ह्यांसाठी 10 आणि 11 सप्टेंबर रोजी आयआरएडी (iRAD) ॲप मार्गदर्शन आणि प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यासंदर्भातील अभिप्राय आणि इतर सूचना प्राप्त झाल्यानंतर या राज्यांमध्ये अॅपची अंमलबजावणी करण्यात येईल.
पायाभूत आयआरएडी (iRAD) अॅप विकसित करण्यात आला असून राज्ये केंद्रशासित प्रदेशांच्या गरजा लक्षात घेऊन सानुकूलित / एकीकृत करण्यात येईल. आयआरएडी (iRAD) अॅप सध्या अँड्राईडवर उपलब्ध असून लवकरच तो आयओएसवर उपलब्ध करुन दिला जाईल.
रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय ‘इंटिग्रेटेड रोड अपघात डेटाबेस प्रकल्प (iRAD)’ राबविण्याच्या प्रक्रियेत असून तो देशभर लागू करण्यात येईल. पहिल्या टप्प्यात हा प्रस्ताव महाराष्ट्र, कर्नाटक, मध्य प्रदेश, राजस्थान, उत्तर प्रदेश आणि तामिळनाडू या सहा राज्यांत अंमलात आणण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आयआरएडीच्या विकास आणि अंमलबजावणीचे काम आयआयटी मद्रास आणि नॅशनल इनफॉर्मेटिक्स सेंटर सर्व्हिसेसकडे सोपविण्यात आले आहे.
अॅप विकसित आणि कार्यान्वित झाल्यावर पोलीस, वाहतूक, आरोग्य यासारख्या भागधारकांना मोबाईल फोनच्या माध्यमातून अपघाताची माहिती गोळा करता येईल.
हा प्रकल्प माहिती तंत्रज्ञान प्रणालीवर आधारीत आहे, ज्यामुळे मोबाईल अॅपच्या माध्यमातून अपघाताची माहिती मिळवता येईल. या डेटाचा उपयोग अपघातांची कारणे शोधणे आणि रस्त्यांच्या पायाभूत सुविधा सुधारण्यासाठी उपाययोजना करणे, पोलीस, आरोग्य सेवा आणि इतर संबंधित विभागांच्या वापरासाठी अपघातांच्या आकडेवारी नोंदविणे यासारख्या विविध कारणांसाठी वापरले जाऊ शकते
M.Jaitly/S.Thakur/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1653661)
Visitor Counter : 194